वजन नियंत्रणात राहावं किंवा स्लिम फिट दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी कोणी डाएटिंग करतं तर कोणी जीमला जाऊन घाम गाळतं. मागच्या वर्षी लॉकडाऊन सुरू होतं. त्यामुळे अनेकांच्या शरीरयष्टीवर परिणाम झालेला दिसून आला. झटपट वजन कमी करायचं तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडत होता. कारण एकदा वाढलेलं वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आहाराच्या वेळा नियमित असाव्या लागतात. आज आम्ही तुम्हाला परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी काय करता येईल. याबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही जास्त मेहनत न घेता स्वतःला चांगल्या सवयी लावून वजन नियंत्रणात ठेवू शकता.
१) जास्तीत जास्त पाणी प्या
अनेकदा पिण्याच्या पाण्याचे महत्व लोकांना कळत नाही. पाणी फक्त आपल्याला हायड्रेटेड ठेवत नाहीत तर आपल्याला आजारांपासून लांब ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं आणि कमी खाण्यास मदत करतात. जेवणाच्या ३० मिनिटांपूर्वी एक मोठा ग्लास भरून पाणी प्या.
२) जेवणावर नियंत्रण
रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणा दरम्यान आपण काय आणि किती खाल्ले याचा आपल्या वजनावर परिणाम होतो. जर आपण दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणात खूप गॅप घेत असाल तर जास्त भूक लागल्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही जास्त खाणे सुरू कराल. म्हणून संध्याकाळी स्नॅक्स वेळेवर घ्या.
३) घरच्याघरी व्यायाम
आपल्याला रोज व्यायामाची सवय लावायला पाहिजे. जिम किंवा फिटनेस सेंटरमध्ये जाणे देखील आवश्यक नाही. आपण घरी अनेक प्रकारचे व्यायाम करून फिट राहू शकता. आठवड्यातून किमान 5 दिवस तुम्ही व्यायाम करायला हवा. दररोज सुमारे 45 मिनिटे वर्कआउट करून आपण तंदुरुस्त राहू शकता.
४) जंक फूडपासून लांब राहा
तळलेले, मसालेदार किंवा मसालेदार अन्न नेहमी चांगले. उच्च साखर किंवा उच्च सोडियमयुक्त खाद्य (खूप गोड किंवा खारटपणा) पासून दूर रहा. खोल तळलेल्या गोष्टींच्या जवळ जाऊ नका. या खाद्यपदार्थाचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
दिलासादायक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला वेगळं करणारा भारत जगातील पहिला देश; : ICMR
५) संतुलित आहार
हिवाळ्यात हिरव्या भाज्या, कंद मुळांचा आहार घ्या. शरीराला या भाज्यांमधून प्रीबायोटिक्स मिळतात, ज्या आपले वजन वाढू देत नाही. याशिवाय या भाज्या प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. पचन सुधारण्यास देखील मदत करते. आपल्यासाठी रताळे, कांदा, मुळा इत्यादी भाज्या खाणं चांगले राहिल. यासह, ते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यात मदत करतात.
अरे व्वा! आता तुम्हालाही हवी तशी स्वप्न पाहता येणार; वैज्ञानिकांनी बनवलं ड्रीम हॅक डिवाईस
वजन कमी करण्याचे उपाय
रोज नियमित व्यायाम करा, सकाळी उठल्यानंतर 2 ग्लास गरम पाणी प्या, न्याहारी वगळू नका, अन्नामध्ये जास्त चरबी समाविष्ट करू नका, तळलेले अन्न खाणे टाळा, रात्री झोपायच्या आधी लवंगा किंवा दालचिनीचे पाणी प्या, हळदीचे दूध प्या.
(टिप : या लेखातील टिप्स आणि सल्ले हे केवळ माहितीसाठी आहेत. याकडे डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनल्सचा सल्ला म्हणून बघू नका. यात दिलेल्या माहितीचा आम्ही कोणताही दावा करत नाही. ही केवळ रिसर्चमधून समोर आलेली माहिती आहे. वजन कमी करण्यासाठी आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)