जेवण तयार करण्याच्या किंवा वेगवेगळे पदार्थ तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तुम्हाला जेवण तयार करण्याची हेल्दी टेक्निक माहीत असायला हवी. आहार तज्ज्ञ वाफेवर तयार केलेले पदार्थ सर्वात हेल्दी मानतात. यासाठी ते वेगवेगळी कारणे सांगतात. आपण आज तेच जाणून घेणार आहोत की, वाफेवर शिवजलेले पदार्थ खाऊन वजन कमी करण्यास कसा फायदा होतो.
वाफेवर कसे तयार केले जातात पदार्थ
अलिकडे वाफेवर अन्न शिजवण्याची अनेक प्रकारची भांडी बाजारात सहजपणे मिळतात. यात इडली आणि मोमोजची भांडी सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. त्यासोबतच प्रेशर कुकरमध्ये शिजवलेल्या अन्नाला सुद्धा आहार तज्ज्ञ वाफेवर शिजवलेलं अन्न मानतात. तसेच वाफेवर अन्न शिजवण्याच्या काही घरगुती पद्धती सुद्धा लोक वापरतात.
वाफेवर शिजवण्याची पारंपारिक पद्धत
पूर्वी महिला घरात पारंपारिक पद्धतीने वाफेवर अन्न शिजवत होत्या. यासाठी त्या एका मोठ्या भांड्यात पाणी उकडवत होत्या. या भांड्याच्या तोंडावर त्या एक कपडा बांधत होत्या. या कापडावर डाळीचे वडे इत्यादी पदार्थ वाफवून तयार केले जात होते.
वाफेवर तयार पदार्थांचे फायदे काय होतात?
वाफेवर शिजवलेल्या पदार्थांमधून पौष्टिक तत्व नष्ट होत नाहीत. ज्यामुळे यातील प्रोटीन आणि व्हिटॅमिन सुरक्षित राहतात. तसेच अशाप्रकारे अन्न शिजवल्याने तेल किंवा तूपाची गरज पडत नाही. ज्यामुळे हे अन्न फॅट फ्री मानलं जातं. त्यामुळेच वजन कमी करणाऱ्यांसाठी हे पदार्थ फायदेशीर मानले जातात. अशाप्रकारे भाज्या शिजवल्याने त्यांचा रंग आणि चमकही कायम राहते.
वजन राहतं नियंत्रणात
वाफेवर शिजवलेले पदार्थ हे लो कॅलरी फूड असतात. यात तूप किंवा तेलाची गरज नसते. त्यामुळे या पदार्थांना फॅट फ्री मानलं जातं. अर्थातच याने तुमचं वजन वाढत नाही.
हेल्दी हार्ट
वाफेवर शिजवलेले पदार्थ खाणं हार्टसाठीही हेल्दी मानले जातात. यात धमण्यांच्या आरोग्याला नुकसान पोहोचवणारे बॅड कोसेस्ट्रॉल नसतात. त्यामुळे हे लहान मुलांना आणि मोठ्यांनाही सहज देता येऊ शकतात.
जास्त पौष्टिक
वाफेवर शिजवलेले पदार्थ हे इतर पद्धतीने शिजवलेल्या पदार्थांपेक्षा जास्त पौष्टिक मानले जातात. यात शिजवलेले पदार्थ ना जळतात ना यात काही नुकसानकारक तत्त्व तयार होत. यात भाज्या आणि धान्यांचे सर्वच पौष्टिक तत्व सुरक्षित राहतात.