केळ्याच्या समावेश पोषक तत्व असलेल्या पदार्थांमध्ये होतो. व्यायाम करणारी मंडळी रोजच केळी खातात. केळी खाल्ल्यानं वजन वाढतं, केळी खाल्ल्यानं सर्दी होते, असे वेगवेगळे समज लोकांच्या मनात असतात. तुमचा विश्वास बसणार नाही पण वजन कमी करण्यासाठी केळी फारच उपयुक्त आहे. केळी पिकण्याच्या प्रत्येक टप्प्यात अनेक फायदे मिळतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला योग्य केळीचे सेवन करण्याचा सर्वात चांगला मार्ग सांगत आहोत, जेणेकरून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होऊ शकतील.
पिवळी केळी
आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल प्रत्येकासाठी पिवळी केळी हा एक चांगला पर्याय आहे. कोणत्याही प्रकारच्या केळ्यापेक्षा पिवळी केळी जास्त फायदेशीर असतात. जर एखाद्या व्यक्तीने पिवळी केळी खाल्ली तर त्याचे सर्व फायदे शरीराला मिळतात. कारण केळ्यात डाएटरी फायबर्स असतात. केळ्याचं सेवन केल्यास पचनक्रिया व्यवस्थित राहते. पोट साफ होण्यास तुम्हाला त्रास होत असेल तर केळ्याच्या सेवनानं ही समस्या दूर होईल.
डाग असलेली केळी
जर केळी घरात जास्त काळ बाहेर ठेवली तर काळी होण्यास सुरूवात होते. केळ्याचा वरचा थर तपकिरी होऊ लागतो. म्हणूनच याला तपकिरी केळी म्हणतात. अहवालानुसार, पिवळ्या केळीमध्ये 6.35 ग्रॅम स्टार्च आढळतो, तर तपकिरी केळीमध्ये त्याची पातळी 0.45 ग्रॅमपर्यंत खाली जाते. पिवळ्या केळीत 1.१ ग्रॅम फायबर असते, जे आपल्या पचनसाठी खूप फायदेशीर आहे. जर आपण तपकिरी केळीबद्दल चर्चा केली तर त्यात 1.9 ग्रॅम फायबर आहे. एका अभ्यासानुसार मधुमेहाच्या रुग्णांना डाग असलेली केळी फायदेशीर ठरू शकतात.
हिरवी केळी
बर्याच संशोधकांच्या मते, हिरव्या केळीमध्ये तपकिरी केळ्यापेक्षा साखर आणि प्रतिरोधात्मक स्टार्च कमी असतो. असे म्हणतात की प्रतिरोध स्टार्च हा पचनासाठी सर्वात फायदेशीर मानला जातो, कारण पोटात उपस्थित असलेल्या कोणत्याही प्रकारच्या एन्झाईम्समुळे तो मोडणे शक्य नाही. अशा प्रकारचे केळी खाल्ल्यानंतर, आपल्याला बराच काळ भूक लागणार नाही. म्हणूनच बहुतेक आहारतज्ञ आणि डॉक्टर आपल्याला हिरवी केळी खाण्याची शिफारस करतात. जर आपण ते कच्चे खाऊ शकत नाही तर आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खायला हवे. आपण त्याची भाजी देखील बनवू शकता.
हिरवं केळी खायचं नसेल तर?
आपल्याला हिरव्या केळी खाण्याची इच्छा नसल्यास पिवळी केळी खाण्याकडे लक्ष द्यायला हवे. आपण व्यायामाच्या आधी किंवा नंतर पिवळ्या केळी खाऊ शकता. तपकिरी केळी पिवळ्या केळ्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरते. म्हणूनच आपण डाग असलेल्या केळ्यांचा आहारात समावेश करायला हवा. डाग असलेल्या केळ्यांमध्ये व्हिटामीन बी 6 आणि पोटॅशियम असते. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. डाग असलेली केळी खाल्यामुळे मासिक पाळीतील वेदना सुद्धा कमी होतात. त्यामुळे मासिकपाळीत अंगदुखीमुळे होणारी चिडचिड कमी होते.
डाग असलेल्या केळ्यांमध्ये मेंदूवर ताण- तणाव कमी करण्यासाठी आवश्यक असलेले गुणधर्म असतात. त्यामुळे डाग असलेले केळी खाल्यामुळे मुड चांगला राहून मानसीक ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय सध्याच्या काळात अनियमीत जीवनशैलीमुळे अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या जाणवते. त्यामुळे शरीराच्या विविध भागातून एलर्जीमार्फत विषारी पदार्थ बाहेर पडायला सुरुवात होते. डाग असलेल्या केळ्यामध्ये फायबर्स असतात. विेशेषतः त्यात पेक्टीन नावाचे फायबर असते. त्यामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.