सध्याच्या काळात कोणत्याही वयोगटात समस्या जाणवते ती म्हणजे वजन वाढण्याची. कारण वजन वाढल्यामुळे शरीराचा आकार बेढब दिसतो. आपलं इम्प्रेशन खराब होत असतं. खासकरून तरूण मुलींना वजन वाढलं तर खूप ताण येतो. कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण सुंदर स्लिम दिसावं. वजन वाढलं आणि काहीही केल्या कमी होत नसेल तर करायचं काय? असा प्रश्न आपल्याला पडतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीबद्दल सांगणार आहोत.
(प्रातिनिधीक फोटो)
या मुलीने आपलं वजन एक दोन नाही तर २७ किलोंनी कमी केलं आहे. या मुलीचं नाव प्रिया अग्रवाल असं आहे. वजन वाढल्यानंतर प्रियाला नैराश्याचा सामना करावा लागला होता. सुरुवातीला या मुलीचं वजन ८७ किलो होतं. त्यामुळे प्रचंड ताण-तणावाखाली होती. आज आम्ही तुम्हाला प्रियाने वजन कमी करण्यासाठी नक्की काय केलं ते सांगणार आहोत.
डाएट प्लॅन असा होता
ब्रेकफास्टमध्ये भिजवलेल्या डाळींचा आहार,
दुपारचं जेवण : १ चपाती, उकळलेल्या भाज्या, दही आणि सॅलेड,
रात्रीचं जेवणं : सुप, सॅलेड, डाळींचा आहार.
(प्रातिनिधीक फोटो)
वजन कमी करण्यासाठी प्रियाने मसल ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग आणि कार्डीओ हे व्यायामप्रकार केले. स्वतःला फिट ठेवण्याच्या प्रयत्नात प्रिया स्वतःला हायड्रेट ठेवणं आणि शरीराला आराम देणं किती महत्वाचं असतं हे कळलं. कितीही अडचणी आल्या तरी वर्कआऊट करणं थांबवता कामा नये. त्याजोडीला डाएट सुद्धा फॉलो करणं आवश्यक आहे. त्यासाठी वजन रेग्युलर चेक करणं गरजेचं आहे. तसंच तिने जंक फुड आणि प्रोसेस फुड खाणं पूर्णपणे बंद केलं. सकाळी लवकर उठण्याची आणि रात्री लवकर झोपण्याची सवय वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरली.
(प्रातिनिधीक फोटो)
या पाच महिन्यात स्वतःवर मेहनत घेताना तिला एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे फक्त स्लिम दिसणचं नाही तर हेल्दी राहण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. सुरुवातीला जेव्हा तुम्ही एक किलो वजन कमी करता तेव्हा तुम्हाला पॉजिटिव्ह एनर्जी मिळते आणि त्याच वेगाने तुम्ही वजन कमी करण्यासाठी जास्त मेहनत घेत. असं प्रिया म्हणाली.