Weight Loss Tips : वजन वाढण्याची समस्या आजकाल जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अशात लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. त्यातून काहींना फायदा मिळतो तर काहींना नाही. सामान्यपणे एक उपाय जास्त फॉलो केला जातो. तो म्हणजे लिंबू पाणी. पण खरंच लिंबू पाण्याने वजन कमी होतं का? त्याने वजन कमी कसं होतं? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. त्याचंच उत्तर आज आम्ही देणार आहोत.
कॅलरी कमी होतात
थंड लिंबू पाण्यात कॅलरी फार कमी प्रमाणात असतात. पाण्यात झीरो कॅलरी असतात आणि एका लिंबूमध्ये केवळ 17 कॅलरी असतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान थंड लिंबू पाण्याचं सेवन करणं एक चांगला पर्याय मानला जातो.
मेटाबॉलिज्म मजबूत होतं
लिंबू पाण्यामुळे मेटाबॉलिज्म मजबूत होतं, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. जर शरीर हायड्रेट राहिलं तर याने तुमच्या मायटोकॉन्ड्रियाला योग्यप्रकारे काम करण्यास मदत मिळते.
पोट जास्त वेळ भरलेलं राहतं
लिंबू पाण्याचं सेवन केल्याने तुमची चुकीचे पदार्थ खाण्याची सवय कमी होते. वजन कमी करण्यासाठी जेवणादरम्यान लिंबू पाण्याचं सेवन करा, जेणेकरून भूक नियंत्रित केली जावी. याचं कारण म्हणजे लिंबू पाण्यात कॅलरीचं प्रमाण कमी असतं.
शरीरातील टॉक्सिन्स नष्ट होतात
थंड लिंबू पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि याने शरीर क्लिंज होतं. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
किती लिंबू पाणी प्यावं?
ज्या लोकांचं वजन 68 किलो आहे, त्यांनी 8 ते 12 मिली थंड लिंबू पाण्याचं सेवन करावं आणि ज्या लोकांचं वजन 68 किलोपेक्षा अधिक आहे. त्यांनी रोज 2 वेळा लिंबू पाण्याचं सेवन करावं.