स्पेनमध्ये अचानक 17 मुलांचा चेहरा, तळवे, छाती आणि पाठीवर लांब केस येण्यास सुरुवात झाली आहे. या समस्येला वेयरवोल्फ सिंड्रोम (Werewolf Syndrome) असं म्हणतात. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या तोंडासहित संपूर्ण शरीरावर केस येण्यास सुरुवात होत आहे.
विजनेस इनसाइडर वर प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, या घटनेमुळे स्पेनमधील आरोग्य विभाग हैराण झाला असून तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. असं सांगितलं जात आहे की, या सर्व मुलांना ओमेप्राजोल औषध देण्यात आलं होतं, जे अॅसिड रिफ्लक्स या आजारावर उपचारासाठी वापरण्यात येते.
स्पेनमधील एजन्सी फॉर मेडिसिन्स अॅन्ड हेल्थ प्रोडक्ट्सच्या तपासणीमध्ये असं दिसून आलं की, ओमेप्राजोल या औषधाऐवजी मुलांना जे औषध देण्यात आलं होतं. त्यामध्ये मिनोक्सिडिल होतं, जे केसांची वाड होण्यासाठी देण्यात येणारं औषध होतं.
Werewolf Syndrome म्हणजे नक्की काय?
वेयरवोल्फ सिंड्रोम (Werewolf Syndrome) ला हायरट्राइकोसिस (Hypertrichosis) नावानेही ओळखलं जातं. महिला किंवा पुरूष दोघांवरही या सिंड्रोमचा परिणाम होतो. परंतु, हे अत्यंत दुर्लभ आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला किंवा वयानुसारही हा सिंड्रोम होऊ शकतो.
वेयरवोल्फ सिंड्रोमची लक्षणं :
- जन्माच्या वेळी शरीरावर असलेले केस निघून जाण्याऐवजी वाढणं
- वाढत्या वयानुसार शरीराच्या कोणत्याही भागावरील केस वाढणं
- शरीराच्या कोणत्याही एका अवयवावर जास्त केस येणं
- महिलांची छाती, पाठ आणि चेहऱ्यावर केस येणं
वेयरवोल्फ सिंड्रोमची कारणं :
वेयरवोल्फ सिंड्रोमचं कोणतंही खास कारण नाही आहे. परंतु, असं मानलं जातं आहे की, हा आजार जेनेटिक स्वरूपाचा आहे. काही एक्सपर्ट्स असं मानतात की, या समस्या जीन्सच्या रिएक्टिवेशनच्या कारणामुळेही होऊ शकतो.
- पोर्फिरीया कटानिया टार्डा एक अशी स्थिती आहे. ज्यामध्ये तुमची त्वचा विशेष रूपामुळे प्रकाशाप्रति संवेदनशील होते.
- कुपोषण
- आहार किंवा आहार विकार यांसारख्या एनोरेक्सिया नर्वोसा
- कॅन्सर
- काही औषधं जसं एंड्रोजेनिक स्टेरॉयड, केसांच्या वाढिसाठी वापरण्यात येणारी औषधं म्हणजेच, मिनोक्सिडिल आणि सायक्लोस्पोरिन.
वेयरवोल्फवर उपचार
या आजारावर अद्याप कोणताही उपचार सापडला नाही. केस काढून टाकण्यासाठी तुम्ही शेविंग, केमिकल्स, वॅक्सिंग, प्लकिंग आणि हेअर ब्लीचींग यांसारख्या ट्रिटमेंटचा आधार घेऊ शकता. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही उपाय करू नका. याव्यतिरिक्त लेझर सर्जरी आणि इलेक्ट्रोलायसिस यांसारखे उपचार करू शकता.