भारतामध्ये सध्या वेस्ट नाइल व्हायरस (West Nile virus) धुमाकूळ घालत असून या भयंकर आजाराने सोमवारी आपला पहिला बळी घेतला. डासांमुळे होणाऱ्या या आजाराने पीडित असणाऱ्या सहा वर्षांच्या मुलाने आपला जीव गमावला. केरळचे आरोग्यमंत्री केके शैलजा यांनी ही माहिती देत सांगितले की, यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. कारण हा व्हायरस रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांनी व्हायरस रोखण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुचना दिल्या आहेत. डासांच्या चावण्यामुळे होणारा हा आजार जास्त करून उत्तर अमेरिकेमध्ये होतो.
जवळपास सात महिन्यांपूर्वी कोजीकोड जिल्ह्यामध्ये राहणारी एक महिला सरकारी मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. या महिलेच्या आजाराची लक्षणं वेस्ट नाइल व्हायरसप्रमाणे दिसत होती. परंतु आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर हा व्हायरस नसल्याचे लक्षात आले.
नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (एनसीडीसी) चे केरळचे डायरेक्टर केश्वर्म कुमार यांनी सांगितल्यानुसार, केरळमध्ये या व्हायरसमुळे पहिला मृत्यू झाला आहे. याआधी या आजाराने ग्रस्त असणारा कोणताही रूग्ण विभागात दाखल झाला नव्हता. केरळव्यतिरिक्त कोणत्याही इतर राज्यामध्येही या आजाराचे कोणतेही रूग्ण आढळून आले नाहीत.
या व्हायरसबाबत समजल्यानंतर संपूर्ण राज्यभरात दहशत पसरली आहे. दिल्लीचे प्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉक्टर अजय लेखी यांनी या व्हायरसबाबत माहिती दिली आहे.
वेस्ट नाइल व्हायरस काय आहे? (West Nile virus)
डासांच्या चावण्यामुळे हा व्हायरस मानवाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि याचे अनेक रूग्ण उत्तर अमेरिकेमध्ये आढळून आले आहेत. या व्हायरसचे संक्रमण झालेल्या लोकांना ताप, डोकेदुखी, अंगदुखी, चक्कर येणं, उलट्या होणं आणि त्वचेवर लाल चट्टे येणं इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो.
वेस्ट नाइल व्हायरस (West Nile virus) ची लक्षणं
वेस्ट नाइल व्हायरसची लागण झालेल्या पाचपैकी चार लोकांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. असं मानलं जातं की, या व्हायरसन पीडित व्यक्तीला बराच वेळा ताप येत राहतो. तसेच याव्यतिरिक्त या आजाराच्या लक्षणांमध्ये तापाव्यतिरिक्त, डोकेदुखी, अंगदुखी, चक्कर येणं, उलट्या होणं आणि त्वचेवर निशाण येणं इत्याही समस्यांचा सामना करावा लागतो.
वेस्ट नाइल व्हायरस (West Nile virus) वर उपचार
वेस्ट नाइल व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी कोणतीही विशिष्ट उपचार पद्धती नाही. जर प्रकृती अधिक गंभीर झाली तर रूग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज भासते.
वेस्ट नाइल व्हायरसमुळे मृत्यूचा धोका
वेस्ट नाइल व्हायरस गंभीर आजाराचं कारण तेव्हा होतं जेव्हा हा व्हायरस रक्त आणि मेंदूला बाधित करतं. मेंदू आणि मणक्याच्या हाडाला संक्रमित करू शकतो. व्हायरस मेंदूच्या कामकाजाला बाधित करतं. ज्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होतो.
वेस्ट नाइल व्हायरसपासून बचाव करण्याचे उपाय
- यापासून बचाव करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला डासांपासून दूर राहावं लागेल.
- जेव्हा तुम्ही बाहेर जाता, त्यावेळी इन्सेक्ट रिपेलेंट्स (बग स्प्रे) चा उपयोग करावा.
- जेव्हा डास सर्वात जास्त सक्रिय असतात, म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी जास्त बाहेर फिरू नका.
- शक्यतो संध्याकाळी घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा.
- आपल्या घराच्या आजूबाजूला डासांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करा.
कुठून आला हा व्हायरस ?
वेस्ट नाइल व्हायरस पहिल्यांदा 1999मध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये आढळून आला होता. परंतु अमेरिकेमध्ये या डासाची उत्पत्ती कशी झाली याबाबत काहीच माहिती नाही.