जिमनंतर काय खाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2016 5:55 PM
आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसण्यासाठी आज बहुतेकजण जिमला जाऊन तासनतास मेहनत करताना दिसतात. मात्र शरीराला फिट ठेवण्यासाठी केवळ जिमला जाणेच पुरेसे नसून, त्यासाठी परिपूर्ण आणि योग्य आहारदेखील तेवढाच महत्त्वाचा आहे.
आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसण्यासाठी आज बहुतेकजण जिमला जाऊन तासनतास मेहनत करताना दिसतात. मात्र शरीराला फिट ठेवण्यासाठी केवळ जिमला जाणेच पुरेसे नसून, त्यासाठी परिपूर्ण आणि योग्य आहारदेखील तेवढाच महत्त्वाचा आहे. मग जिमनंतर नेमका कोणता आहार घ्याल याविषयी जाणून घ्या जेणेकरुन तुुमचे शरीर होईल आणखी मजबूत.केळकेळात लोह, प्रथिने, खनिज, अँटीआॅक्सिडेंट्स आणि पोटॅशियम असते. जे नर्व्हस सिस्टमला उत्तम ठेवते आणि तुमच्या स्नायूंना मजबूत करते.रताळे रताळेसुद्धा उर्जेचा एक उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये कार्बोहायड्रेटस् आणि अँटीआॅक्सिडेंट असते. ज्यातून शरीराला उर्जा मिळते. त्यामुळे व्यायामाच्या अगोदर रताळे खाणे चांगले असते.सुका मेवाव्यायाम केल्यानंतर तुम्ही सुकामेवा खाऊ शकता. यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, मनुके खावू शकता. यात भरपूर प्रमाणात मोनोसॅचुरेटेड फॅट असते, जे शरीराला ताकद देते. शिवाय हे शरीराला आजारांपासून दूरसुद्धा ठेवते.अंडेअंड्यात प्रोटीन आणि खनिज असते. यामुळे तुमचा स्टॅमिना आणि ताकद वाढवण्यासाठी मदत होते. तुम्ही कच्चे किंवा उकडून कशाही प्रकारे अंडे खाऊ शकता. अंडे रक्तात गुड कोलेस्ट्रॉल एचडीएलचे प्रमाण वाढवण्याचेही काम करते.ओट्सओट्समध्ये व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असते. जे शरीराचा तणाव कमी करण्यात मदत करतात. व्यायाम केल्यानंतर हे खाल्ले तर शरीराची ताकद आणि क्षमता वाढते. याला दूधासोबतही घेऊ शकतो. ओट्स पचायला हलके आसतात. ओट्समधला कार्बोहायड्रेटस् रक्तात प्रवाहित होऊन शरीराला उर्जा देण्यासाठी मदत करतात.