जेव्हाही अॅंटी-ऑक्सिडेंटचा विषय निघतो तेव्हा प्रत्येकजण हेच सांगतो की, याचं सेवन आरोग्यासाठी गरजेचं आहे. ज्या पदार्थांचं आपण सेवन करतो त्यांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंटचा समावेश असणं गरजेचं मानलं जातं. पण याचं सेवन करणं किंवा हे शरीराला मिळणं गरजेचं का आहे? याचं उत्तर फार कमी लोकांना माहिती असेल. अॅंटी-ऑक्सिडेंटला आपल्या शरीराचे फायटिंग एजंट म्हटलं जातं. जे आपल्या शरीरातील आजारांसोबत लढा देऊन आपली सुरक्षा करतात.
इतकेच नाही तर अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच अॅंटी-ऑक्सिडेंट आपल्या शरीरातील फ्री रेडिकल्स(बॅक्टेरिया) नियंत्रित करतात. फ्री रेडिकल्स ते हानिकारक तत्व असतात जे आपल्या शरीरातील पेशींना हानी पोहोचवतात. चला जाणून घेऊ अॅंटी-ऑक्सिडेंट आपल्या शरीरासाठी इतकं गरजेचं का आहे.
निरोगी फुफ्फुसासाठी
जर तुमच्या रक्तामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंटचा फ्लो चांगला असेल तर तुमच्या फुफ्फुसांचं कार्य योग्यप्रकारे चालण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला क्रिप्टोजेंथिन आणि व्हिटॅमिन इ असलेल्या पदार्थांचं सेवन करावं लागेल. हे तत्व मिळवण्यासाठी बदाम, पालक, एप्रिकोट्स चांगले पर्याय आहेत.
त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी
अॅंटी-ऑक्सिडेंटचं भरपूर प्रमाणे हे तुमच्या त्वचेसाठीही गरजेचं असतं. याने तुमच्या त्वचेचा इंफ्लेमेशनपासून बचाव होतो. म्हणजेच त्वचेवर सूज येत नाही. त्यासोबतच अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे तुमच्या त्वचेचा सूर्याच्या घातक किरणांपासूनची बचाव होते. यामुळे त्वचेवर काळे डाग किंवा इतरही समस्या होत नाहीत.
मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर
आपलं शरीर व्हिटॅमिन सी हे तत्व अॅंटी-ऑक्सिडेंटमध्ये बदलतं. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन इ आपल्या मेंदूला चांगल्याप्रकारे काम करण्यास मदत करतात. जर आपला मेंदू योग्यप्रकारे काम करत नसेल तर पूर्ण शरीराची क्रिया प्रभावित होते. अॅंटी-ऑक्सिडेंटच्या मदतीने डिमेंसियाचा धोकाही कमी होतो. यासाठी तुम्ही पपई, ब्रोकोली, लिंबू, संत्री, शेंगदाणे यांचा आहारात समावेश करावा लागेल.
डोळ्यांसाठीही चांगलं
व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ आणि बीटा-कॅरोटीनचं सेवन केल्यास तुमच्या डोळ्यांना फायदा होतो. अॅंटी-ऑक्सिडेंट तुमच्या डोळ्यात मेक्युलर डिजनरेशन होण्याची शक्यता कमी करतं. मेक्युलर डिजनरेशनमुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी जाण्याची शक्यता असते. यासाठी पालक, केळी, गाजर आणि रताळे यांचं सेवन कराव.
केसांची वाढ
अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे केस वेगाने वाढण्यासही मदत मिळते. याने केसांची मुळंही मजबूत होतात. यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन सी युक्त फळे जसे की लिंबू, संत्री आणि स्ट्रॉबेरी यांचा आहाराच समावेश करावा लागेल.