बॉडी बिल्डींग करणाऱ्यांनी स्टेरॉइड हे नाव नक्कीच ऐकलं असेल. तसेच तुम्हीही बातम्यांमध्येही अनेकदा ऐकलं असेल की, खेळाडू स्पर्धेपूर्वी डोप टेस्टमध्ये फेल झाले. त्यासोबतच अनेकदा तरूण मंडळी किंवा बॉडी बिल्डर्स कमी वेळात चांगली बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉइड किंवा इंजेक्शनचा वापर करतात.
(Image Credit : CrazyBulk)
काही लोक याला इंजेक्शन म्हणतात, तर काही लोक याला स्टेरॉइड नावाने ओळखतात. अनेकजण बॉडी बनवण्याच्या नादात यापासून होणाऱ्या नुकसानाचा काहीही विचार न करता याचा वापर सुरू करतात. त्यामुळे त्यांना कालांतराने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला स्टेरॉइड काय आहे? आणि एक्सरसाइज करणाऱ्यांनी याचा वापर का टाळावा हे सांगणार आहोत.
(Image Credit : blogbuzzllc.com)
स्टेरॉइड एक रासायनिक पदार्थ आहे, जो आपल्या शरीरात तयार होतो. तसेच हे एक नैसर्गिक रासायनिक पदार्थाचं रूपही आहे. ज्याचा वापर एखाद्या विशेष आजाराच्या उपचारावेळी केला जातो. त्यासोबतच स्टेरॉइडला एक असं औषध म्हणून ओळखलं जातं जे मांसपेशींचा विकास करतं. अनेकदा काही खेळाडू याचा वापर करतात, पण याचा वापर करणं प्रतिबंधीत आहे.
स्टेरॉइडचे दुष्परिणाम
पुरूषांमध्ये मानसिक रूपाने समस्या वाढण्याची शक्यता जास्त असते. असं होण्याचं कारण म्हणजे त्यांना वाटत असतं की, स्टेरॉइडचा वापर बंद केल्याने त्यांच्या मांसपेशी आणि शक्ती कमी होईल. या स्थितीपासून बचाव करण्यासाठी काही खेळाडू अनेकदा जास्त काळ स्टेरॉइडचा वापर करत राहतात.
(Image Credit : UNSW Newsroom)
स्टेरॉइडचा फार जास्त वापर केल्याने अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. स्टेरॉइडचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये खोकला, सर्दी अशा समस्या सतत होण्याचा धोका असतो. तसेच याने अनेक जीवघेण्या समस्या होण्याचाही धोका होऊ शकतो.