Garlic Benefits : लसूण आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग आहे. त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण हे फायदे अनेकांना माहीत नसतात. कच्च्या लसणाच्या सेवनाने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. त्याच आज आपण जाणून घेणार आहोत.
आयुर्वेदानुसार, लसणामध्ये अॅंटीसेप्टीक, अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी व्हायरल आणि अॅंटी इन्फ्लामेटरी गुण असतात. सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 2 ते 3 कळ्या खाल्ल्या तर आजार दूर केले जाऊ शकतात. तसेच याने शरीरातील अवयव निरोगी आणि शक्तीशाली बनतात.
पोषण
शक्ती वाढवण्यासाठी प्रोटीन आणि इतर पोषक तत्व फार गरजेचे असतात. लसणाच्या या पांढऱ्या कळ्यांमध्ये प्रोटीन, कार्ब्स, मॅगनीज, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि फायबर असतं.
इम्यूनिटी वाढते
इम्यूनिटी वाढवण्यासाठीही लसूण खाल्ला जातो. 2016 मधील एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, कच्चा लसूण खाल्ल्याने सर्दी-खोकलासारख्या सामान्य समस्या लगेच दूर होतात. या प्रक्रियेत एका खास लिक्विडमध्ये कळ्या भिजवून ठेवल्याने 20 महिन्यांपर्यंत स्टोर करता येतात.
पुरूषांसाठी फायदेशीर
महिलांच्या तुलनेत पुरूषांना हृदयरोगांचा धोका अधिक राहतो. ज्याचं मोठं कारण म्हणजे हाय ब्लड प्रेशर आहे. नियमितपणे लसणाचं सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरच्या औषधासारखा प्रभाव बघण्यात आला आहे.
स्टॅमिना वाढतो
लसणाचा वापर तुम्ही स्टॅमिना वाढवण्यासाठीही केला जाऊ शकतो. जुन्या काळात ग्रीसमधील खेळाडू या उपायाचा वापर करत होते. जेणेकरून त्यांना थकवा आणि कमजोरी जाणवू नये.
हाडांसाठी फायदेशीर
हाडे कमजोर झाली असतील आणि वेदना होत असेल हा उपाय तुम्ही नक्की करू शकता. अनेक शोधात हे आढळून आलं आहे की, महिला लसणाचं सेवन करून ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियो आर्थरायटिसचा धोका कमी करू शकतात.