Copper Bottle Water Benefits: वेगवेगळ्या धातुंचे आपल्या आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे त्यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. तांब्याचाही आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने वापर केला जातो. बरेच लोक तांब्याच्या बॉटलमधील पाणीही पितात. यातून अनेक पोषक तत्व शरीरात जातात. तांबाच्या भांड्यात किंवा बॉटलमध्ये रात्रभर ठेवलेलं पाणी सकाळी झोपेतून उठल्यावर प्याल तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात. हे फायदे काय काय आहेत आणि हे पाणी पिताना काय चुका करू नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे
१) कॅन्सर धोका टळतो
कॅन्सरला मुख्य कारण फ्री रेडिकल्स आणि त्यांचे नुकसानकारक प्रभाव आहे. तांब एक अॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात काम करून सगळ्या फ्री रेडिकल्स विरोधात लढतं. तसेच त्यांच्या नकारात्मक प्रभावांना नष्ट करतं. त्यासोबतच तांब्यातून मेलेनिनचं उप्तादन करण्यास मदत करतं. जे सूर्याच्या नुकसानकारक किरणांपासून बचाव करतो.
२) हाय ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं
अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, तांब्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रिग्लिसराइड स्तर कमी करण्यासाठी ओळखलं जातं. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जन्मापासूनच कॉपर कमी असेल तर यामुळे हायपरटेंशन वाढण्याचा धोका असतो. अशात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोल केलं जाऊ शकतं.
३) एनीमियापासून बचाव
शरीरात आयर्न कमी झालं तर एनीमियाची समस्या समस्या होते. अशात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने एनीमियाची समस्या दूर करण्यास मदत मिळते. शरीरात तांब कमी झालं तर हेमेटोलॉजिकल विकार होऊ शकतो. पांढऱ्या रक्त पेशी कमी झाल्यानेही असं होतं. अशात तांब खाद्याला हीमोग्लोबिन बनवण्यास मदत करतं. याने तुमच्या शरीरातील आयर्न अवशोषित करण्यास मदत होते.
४) पचन चांगलं होतं
आयुर्वेदात दावा केला जातो की, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं आणि शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसेच या पाण्याने पोटातील सूज कमी होते आणि पचन चांगलं होण्यास मदत मिळते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पोटाचा अल्सर, अपचन आणि पोटात इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना या चुका टाळा
न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी सांगितलं की, तांब्याच्या भांड्यातील पाणी तेव्हाच शरीरासाठी फायदेशीर ठरतं जेव्हा तुम्ही पद्धतीने त्याच वापर कराल. अशात तांब्याच्या भांड्यातील किंवा बॉटलमधील पाणी पिताना या 3 चूका करणं टाळलं पाहिजे. नाही तर शरीरात वेदनेसह गंभीर आजारांचा धोकाही राहतो.
तांब्याच्या बॉटलने दिवसभर पाणी पिणे
जर तुम्ही दिवसभर तांब्याच्या बॉटल किंवा भांड्यातील पाणी पित असाल तर शक्यता आहे की, तुमच्या शरीरात कॉपरचं प्रमाण जास्त होईल. यामुळे मळमळ होणे, चक्कर येणे, पोटदुखीसोबत लिव्हर आणि किडनी फेल होण्याचा धोकाही होऊ शकतो.
तांब्याच्या भांड्यात लिंबू आणि मध टाकलेल्या पाण्याचं सेवन
हे सत्य आहे की, सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध टाकलेलं पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण जेव्हा तुम्ही हे पाणी तांब्याच्या भांड्यातून सेवन करता तेव्हा ते विषासारखं काम करतं. लिंबात आढळणारं आम्ल कॉपरसोबत मिळून शरीरात अॅसिड तयार करतं. ज्यामुळे पोटदुखी, पोटात गॅस आणि उलटी होण्याचा धोका राहतो.
तांब्याची बॉटल रोज स्वच्छ करणे
तांब्याचं भांड नियमितपणे धुवू नये. रोज हे भांडं धुतल्याने यातील फायदेशीर गुण कमी होऊ लागतात. त्यामुळे एकदा वापरल्यावर ते केवळ पाण्याने धुवून घ्या. आणि महिन्यातून एकदा मीठ आणि लिंबूचा वापर करून चांगल्या प्रकारे स्वच्छ करा.