Boiled Potato Benefits : बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतं. मात्र, यात शरीरासाठी आवश्यक अनेक पोषक तत्वही असतात. उकडलेला बटाटा फ्राइड किंवा इतर पद्धतीने बनवण्यात आलेल्या बटाट्याच्या तुलनेत अधिक हेल्दी असतो. अशात आज आम्ही तुम्हाला उकडलेला बटाटा खाण्याचे फायदे सांगणार आहोत. जो खायला तर चांगला लागतोच सोबतच याने शरीराला अनेक फायदेही मिळतात.
पचन तंत्र राहतं मजबूत
उकडलेल्या बटाट्यामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं, जे पचन तंत्र हेल्दी ठेवण्यास मदत करतं. याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत मिळते आणि पचनक्रिया चांगली होते.
वजन कमी करतो
जास्तीत जास्त लोकांना हेच माहीत आहे की, बटाट्याने वजन वाढतं. पण हे सत्य नाहीये. उकडलेल्या बटाट्यामध्ये कॅलरी कमी असतात आणि यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. यामुळे पुन्हा पुन्हा काही खाण्याची ईच्छा कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.
मांसपेशी होतात मजबूत
उकडलेल्या बटाट्यामध्ये पोटॅशिअमचं प्रमाण भरपूर असतं, जे मांसपेशींच्या कार्यासाठी चांगलं असतं. याने मांसपेशींमध्ये वेदना आणि आखडलेपणा कमी करण्यास मदत करतं.
हृदय राहतं निरोगी
उकडलेल्या बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी ६ असतं, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतं. हे होमोसिस्टीनचं प्रमाण कमी करण्यास मदत करतं. जे हृदयासाठी घातक असतं.
त्वचेसाठी फायदेशीर
उकडलेल्या बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतं. याने कोलेजनचं उत्पादन वाढतं, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि तरूण दिसते.
ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं
उकडलेल्या बटाट्यामध्ये पोटॅशिअमचं प्रमाण भरपूर असतं. जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतं. याने हाय ब्लड प्रेशरसंबंधी धोका कमी करण्यास मदत मिळते.
एनर्जी मिळते
उकडलेल्या बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण भरपूर असतं, जे शरीराला ऊर्जा देतं. याने थकवा आणि कमजोरी दूर होण्यास मदत मिळते.