शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
3
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
4
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
5
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
6
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
7
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
8
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
9
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
10
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान
12
ऐकावं ते नवलंच! हेमंत सोरेन यांचे वय 5 वर्षात 7 वर्षांनी वाढले, भाजपने साधला निशणा...
13
भाजपाने केला करेक्ट कार्यक्रम? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!
14
ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी! पक्ष संघटनेच्या विरोधात काम करीत असल्याने कारवाई
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
16
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
17
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
18
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
19
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
20
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान

काय आहेत लहान वयात केसगळती होण्याची कारणे? जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 11:35 AM

Hairfall Problem Reason : केस गळती होण्याची अनेक कारणे आहेत. कधी कधी तुम्ही आजारी पडल्यानंतरही केस गळतात. वेळेआधीच केस गळणे म्हणजे तुम्हाला काहीतरी समस्या आहे.

Hairfall Problem Reason : केस गळणे ही समस्या अनेकांना सतावत असते. एका वयानंतर केस गळणे सामान्य बाब आहे. पण कमी वयातच तुमचे केस गळत असतील तर तुम्हाला नक्कीच केसांशी संबंधीत काहीतरी समस्या आहे असे समजा. केस गळती होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये थकवा, त्वचेचा कोरडेपणा, भूक कमी लागणे, पोट खराब असणे, शरीरात पोषक तत्वांची कमतरता असणे ही आहेत. या कारणांवरुनच केसगळण्याचे प्रकार पडतात. 

केस गळती होण्याची कारणे

केस गळती होण्याची अनेक कारणे आहेत. कधी कधी तुम्ही आजारी पडल्यानंतरही केस गळतात. वेळेआधीच केस गळणे म्हणजे तुम्हाला काहीतरी समस्या आहे. असंतुलित डाएट हेही याचं एक कारण असू शकतं. किंवा एखाद्या आजाराच्या काही काळापासून सुरु असलेल्या उपचारामुळेही केस गळती होते. तसेच एखाद्या प्रकारचा मानसिक आघातामुळेही केस गळण्याची समस्या होते. रक्त संचार कमी झाल्यानेही केस गळतात. डायबेटिजने ग्रस्त असलेल्या रुग्णांनाही केस गळतीची समस्या होऊ शकते. केसांची योग्य काळजी न घेणे, स्वच्छता न ठेवणे, केसात कोंडा होणे यामुळेही केस गळतात. 

केस गळतीचे प्रकार

केस गळतीचा एका प्रकाराला मेल पॅटर्न बाल्टनेस असं म्हणतात. यात केस गळतीनंतर पुन्हा पातळ केस येतात. ते जवळपास अदृश्यच असतात. हे केस दिसत नसल्याने व्यक्तीचं टक्कल दिसायला लागतं. केसगळतीच्या रुग्णांमधील 90 टक्के रुग्ण या श्रेणीत येतात. 

काय करावे उपाय ?

खोबऱ्याचं तेल बदामच्या तेलात मिश्रित करुन हळुवार मालिश करा. ही मालिश तुम्ही 15 मिनिटांपर्यंत करु शकता. त्यानंतर कोमट पाण्याने टॉवेल भिजवून केसांवर गुंडाळा. ते तसेच 2-3 मिनिटे ठेवा. असे काही दिवस सतत केल्यास केसांचे मुळ मजबूत होतात. सोबतच केस गळतीही कमी होते. 

(टिप- या उपायाने तुम्हाला केस येतीलच असा दावा आम्ही करत नाही. काही लोकांना हा उपाय लागू पडेल तर काहींना नाही. त्यामुळे योग्य उपचारासाठी डॉक्टरांचाही सल्ला घेणे आवश्यक आहे)

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स