Protein Rich Fruits: जेव्हा कधीही प्रोटीनची चर्चा होते तेव्हा सगळ्यात आधी डोळ्यात मांस, मासे आणि अंडी येतात. पण सगळेच काही मांसाहार करू शकत नाहीत. अशात त्यांना दुसरे पर्याय शोधावे लागतात. प्रोटीन आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं असतं. ज्याने आपल्या मांसपेशी मजबूत राहतात ज्यामुळे शरीर मजबूत राहतं. अशात आज आम्ही प्रोटीन मिळवण्यासाठी काही पर्याय सांगणार आहोत.
हाय प्रोटीन असलेली फळं
प्रोटीनसाठी जास्त मांस खाणं नुकसानकारक ठरू शकतं. कारण यातून तुम्हाला भरपूर फॅट मिळतं ज्यामुळे पोट आणि कंबरेवर चरबी जमा होते. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टींची निवड करावी ज्यात फॅट असू नये आणि प्रोटीनही भरपूर असावं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फळांबाबत सांगणार आहोत.
पेरू
पेरू एक फारच टेस्टी फळं असतं जे तुम्ही थेट किंवा सलादच्या रूपात खाऊ शकता. याचा ज्यूस किंवा जेलीही तयार केली जाते. याचा गर लाल किंवा पांढरा असतो. ज्यात भरपूर फायबर असतं. जर तुम्ही 100 ग्रॅम पेरू खाल्ले तर तुम्हाला 2.6 ग्रॅम प्रोटीन मिळू शकतं.
खजूर
खजूर हे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानलं जातं. हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता. यूनाइटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर (United States Department of Agriculture) च्या आकडेवारीनुसार, खजूराच्या 100 ग्रॅममध्ये 2.45 ग्रॅम प्रोटीन आणि 8 ग्रॅम फायबर असतं.
मनुके
मनुक्यांच्या वापर वेगवेगळ्या रेसिपिज आणि मिठाईंमध्ये केला जातो. हे द्राक्ष सुकवून तयार केले जातात. यूनाइटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरनुसार, 100 ग्रॅम मनुक्यांमध्ये 3 ग्रॅम प्रोटीन असतं.
सुकलेला आलुबुखारा
आलुबुखारा या ड्राय फ्रूटमध्येही प्रोटीन भरपूर असतं. हे डी-हायड्रेट करून बनवलं जाऊ शकतं. यात अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. जर तुम्ही 100 ग्रॅम सुकलेले आलुबुखारा खाल तर तुम्हाला यातून 2.18 ग्रॅम प्रोटीन मिळतं.