शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जिमला जाणारे तरूण होताहेत बॉडी इमेज डिसऑर्डरचे शिकार, जाणून घ्या कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 10:51 AM

काही तरूणांवर जिमचा इतका प्रभाव असतो की, ते यामुळे तणावात राहू लागतात. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, तरूण बॉडी बनण्यामुळे फार जास्त तणाव घेतात.

(Image Credit : aliexpress.com)

गेल्या काही वर्षांमध्ये जिम जाण्याची चांगलीच क्रेझ वाढत आहे. प्रत्येकालाच फिट आणि हिरोसारखी बॉडी हवी असते. काही तरूणांवर तर हे भूत इतकं असतं की, ते दिवस दिवसभर जिममध्ये वेळ घालवतात. तर काही तरूणांवर जिमचा इतका प्रभाव असतो की, ते यामुळे तणावात राहू लागतात. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, तरूण बॉडी बनण्यामुळे फार जास्त तणाव घेतात.

(Image Credit : 5 Step Marketing)

नॉर्वेगन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सनुसार, बॉडी बनवण्याच्या तणावात तरूण अनाबोलिक स्टेरॉइड आणि सप्लिमेंट्सचं सेवनही जास्त करू लागतात. सप्लिमेंट्स घेतल्याने शरीरावर अनेकप्रकारचे नकारात्मक प्रभावही पडतात. हे नकारात्मक प्रभाव काय असतात हे जाणून घेऊया...

रिसर्चमधून धक्कादायक निष्कर्ष

(Image Credit : HuffPost)

या रिसर्चमधून समोर आलं आहे की, १० टक्के तरूण पुरूषांमध्ये आपल्या शरीराबाबत गैरसमज असतात. काही पुरूष ते नसतील तरी सुद्धा स्वत:ला फार जास्त लठ्ठ मानू लागतात. या कारणाने वजन कमी करणे आणि फिट राहण्यासाठी मेहनत करण्यासोबतच तणावही घेतात. रिसर्चमध्ये सहभागी तरूणांनी त्यांच्या शरीरासाठी गेल्या तीन वर्षांपासून डाएटही केली, जे लठ्ठपणाशी संबंधित नव्हती. अभ्यासकांनुसार, जास्तीत जास्त तरूण हे बॉडी इमेज डिसऑर्डरचे शिकार आढळले आहेत. 

स्वत:च्या शरीरावर खूश नाहीत तरूण

(Image Credit : TVNZ)

बदलती लाइफस्टाइळ आणि समाजात ही समस्या आव्हान म्हणून समोर येत आहे. जास्तीत जास्त तरूणांमध्ये आपल्या शरीराबाबत अनेक प्रकारचे भ्रम आहेत. तरूण त्यांच्या फिटनेसबाबत संतुष्ट नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे सुशिक्षित लोकही या डिसऑर्डरचे  शिकार होत आहेत.

काय आहे बॉडी इमेज डिसऑर्डर

(Image Credit : Paradigm San Francisco)

एकप्रकारे हा इतरांच्या तुलनेत आपल्या शरीराला कमी समजण्याची किंवा आपल्या शरीरात कमतरता असल्याची भावना ठेवण्याचा हा एक मानसिक आजार आहे. पुन्हा पुन्हा आपलं शरीर आरशात बघणे आणि ते चांगलं करण्यासाठी अधिक मेहनत घेणे यासोबतच कॉस्मेटिक पदार्थांचं सेवन करणं याचाही समावेश आहे.

(Image Credit : Women's Health)

या समस्येमुळे अनेकजण फार सोशलही होत नाहीत. अशात ते तणाव आणि डिप्रेशनचे सुद्धा शिकार होऊ शकतात. तुलना आणि डाएटमध्ये बदल यामुळे शरीरात अनेकप्रकारचे बदल होतात. यामुळे डिप्रेशनची गंभीर समस्या होऊ शकते.

काय आहे उपाय?

जिमला जाण्याचं चलन किंवा बॉडी बनवण्याचं चलन यात कोणत्याही प्रकारची तुलना करू नये. जर तुमच्यातही याप्रकारची भावना असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. जे याचे शिकार झाले आहेत, त्यांना काउन्सिलिंगची गरज पडू शकते. डिप्रेशन आणि तणाव दूर करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स