वजन घटवण्यासाठी उत्तम डाएट आणि व्यायामाची गरज असते. काही व्यायामप्रकार असे असतात ज्यामुळे आपले वजन हळूहळू कमी होते. पण काही अशाही एक्सरसाईज आहेत ज्यामुळे वजन झटपट कमी होते. अशीच आहे बर्पी एक्सरसाईज. कशी करायची? जाणून घ्या.
कशी करावी बर्पी एक्सरसाईज?पहिले स्क्वॅट पोजिशनमध्ये बसा. दोन्ही पायांमध्ये अंतर येऊ द्या. हे अंतर खांद्याइतके असू द्या. लक्षात घ्या यात तुमची कंबर पूर्ण सरळ पोझिशनमध्ये असली पाहिजे. आता आपले दोन्ही हात जमीनीवर टेकवा. पाय मागील बाजूस सरळ करून पुशअपच्या पोझिशनमध्ये आणा. आता एकदा पुश अप करा. लक्षात ठेवा तुमची कंबर सरळ असली पाहिजे.आता पुन्हा स्क्वॅट पोजिशनमध्ये या. नंतर उभे रहा. हात डोक्यावर ठेऊन जितकी उंच उडी मारता येईल तितकी उंच उडी मारा.हेच सतत करत राहा.
याचे फायदेही एक्सरसाईज करताना तुम्हाला लगेच थकवा जाणवू शकतो त्यामुळे जितक्या वेळा जमेल तितक्याच वेळा ही एक्सरसाईज करा. आता याचे फायदे लक्षात घ्या.
- ही एक्सरसाईज केल्याने तुमचे वजन लवकर कमी होऊ लागते. कारण या एक्सरसाईजमुळे मॅटाबोलिजिम वाढते व कॅलरी वेगाने बर्न होतात.
- या एक्सरसाईजमुळे तुमचा स्टॅमिना वाढतो. तुमचे ब्लडप्रेशरही व्यवस्थित होते.
- या एक्सरसाईजमुळे तुमचे मसल्स मजबूत होतात
- तसेच हा व्यायाम केल्याने तुमच्या पोटाची चरबी पण कमी होते.