(Image Credit : medicalnewstoday.com)
महिलांच्या शरीरात ज्या गोष्टीची सर्वात जास्त काळजी घेतली जाते ती गोष्ट म्हणजे त्वचा. त्वचेसांबंधी वेगवेगळ्या समस्यांही त्यांच्यात बघायला मिळतात. त्यातील एक जास्त बघायला मिळणारी समस्या म्हणजे सेल्युलाइट. महिलांमध्ये सेल्युलाइटबाबत वेगवेगळे गैरसमज आहेत. इंटरनेट सर्च केलं तर ही समस्या होण्याची वेगवेगळी कारणे वाचायला मिळतात. काही कारणांमध्ये काही पदार्थांमुळे सेल्युलाइट ही समस्या होते असं सांगण्यात आलं आहे. पण हे सत्य नाही. कारण सेल्युलाइट ही समस्या मुख्य रूपाने महिलांमध्येच का होते, याचं एक खास कारणही आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
सेल्युलाइटचे जुने दावे खोटे?
द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, सेल्युलाइटबाबत सर्वात जास्त दावा हा केला जातो की, एक्सरसाइज केल्याने सेल्युलाइट होतं. काही लोक खराब आहार आणि शरीरात तयार होणारे विषारी पदार्थ सेल्युलाइटचं कारण सांगतात. पण या रिसर्चमध्ये या गोष्टींना नाकारण्यात आलं आहे. कारण अभ्यासकांनुसार, विषारी पदार्थ जसे की, अल्कोहोल किंवा इतर नशेच्या पदार्थांचं पुरूष सेवन करतातच, पण त्यांच्यात सेल्युलाइटची समस्या बघायला मिळत नाही.
रिसर्च काय सांगतो?
(Image Credit : theconversation.com)
नव्या रिसर्चमध्ये महिलांमध्ये सेल्युलाइटच्या कारणाचा शोध घेण्यात आला. अभ्यासकांनुसार, महिलांमध्ये सेल्युलाइटचं मुख्य कारण आहे की, महिलांच्या शरीरात मोठ्या फॅट पेशी असतात. महिलांमध्ये या मोठ्या फॅट पेशी हार्मोन्समुळे असतात. पुरूषांमध्ये महिलांच्या तुलनेत लहान फॅट पेशी असतात. तसेच पुरूषांच्या त्वचेच्या खाली फॅटचं प्रमाणही कमी असतं. त्यामुळे पुरूषांमध्ये सेल्युलाइट समस्या बघायला मिळत नाही.
महिलांमध्ये का असते सेल्युलाइट समस्या?
असं नाही की, सर्वच महिलांना सेल्युलाइटची समस्या असते. महिलांमध्ये ही समस्या तेव्हा होते, जेव्हा शरीरात फॅटचे लोब्यूल्स वाढू लागतात. त्यासोबतच शरीरात जेव्हा कोलेजनचं प्रमाण घटू लागतं तेव्हा त्वचेची मजबूती कमजोर होऊ लागते. आणि त्वचेच्या बाहेरील भागात फॅट अर्थात सेल्युलाइट दिसू लागतं.
मोठ्या फॅट पेशींचं कारण
महिलांमध्ये मोठ्या फॅट पेशी त्यांच्या हार्मोन्समुळे असतात. कारण महिलांना बाळांना जन्म देण्यासाठी तयार रहावं लागत असतं. बाळाला गर्भात पोषण देण्यासाठी शरीर अनेक ठिकाण फॅट जमा करून ठेवतं. जसे की, हिप्स आणि मांड्यांवर. हे फॅट बाळाच्या पोषणाच्या उपयोगात येतं. त्यासोबतच बाळाच्या जन्मानंतर ब्रेस्ट फिडिंगसाठीही ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा फॅटमधून मिळते.
सेल्युलाइटची समस्या दूर कशी करावी?
एका रिसर्चनुसार एवढं नक्की की, जर सेल्युलाइटची समस्या दूर करायची असेल तर फॅटवर नियंत्रण ठेवण्यासोबतच कोलेजनचं प्रमाणही वाढवावं लागेल. शरीरात कोलेजन वाढण्यासाठी हेल्दी डाएटची गरज असते. कोलेजनचं प्रमाण वाढवण्यासाठी भाज्यांसोबतच जांभूळसारखी फळं खावीत आणि प्रोटीन डाएटही घ्यावी.
हेल्दी डाएटसोबतच एक्सरसाइज प्रत्येकासाठीच गरजेची असते. वाढतं वय सुद्धा कोलेजनचं प्रमाण कमी होण्याचं कारण असतं. अशात शरीर अॅक्टिव ठेवून तुम्ही फिट राहू शकता.