शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

काय सांगता! सरकारने पाडले १५,६०० दात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2022 9:34 AM

खासगी रुग्णालयात किंवा क्लिनिकमध्ये दातांच्या उपचारासाठी भरमसाट खर्च येतो. 

  लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयुष्यात एकदा तरी दातांच्या दुखण्याला किंवा त्यावरील उपचाराला सामोरे जावेच लागते. अनेक जणांना दातांचे दुखणे म्हटले की, अंगावर शहारे येतात. काही जण तर भीतीपोटी उपचार घ्यायलाही नकार देतात. मात्र, दुखणे बळावले की दंतरोगतज्ज्ञाकडे जावेच लागते. सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरातील शासकीय दंत महाविद्यालयही त्यास अपवाद नाही. 

रक्त चाचण्या आणि बायोप्सी २,२००(रुग्णाला काही पूर्व आजार आहेत का, हे पाहण्यासाठी शस्त्रक्रियेपूर्वी काही मूलभूत रक्तचाचण्या केल्या जातात. तसेच शस्त्रक्रियेदरम्यान पेशींचा तुकडा घेऊन अधिक तपासणीकरिता बायोप्सी केली जाते.)

दातांचे एक्स-रे ३०,५०७(दातातील कीड कुठपर्यंत पोहोचली आहे आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या हाडांची झीज किती झाली आहे हे पाहण्यासाठी एक्स-रे काढला जातो.)

दातांचे फिलिंग ६,५००(दाताला लागलेली कीड वरवर असते त्यावेळी छोटासा खड्डा झालेला असतो. तिथे अन्न अडकते मात्र फारशा वेदना होत नाहीत. त्यावेळी फिलिंग केल्यास दात वाचतो.)

कवळ्या २,०००(विशेष करून वृद्धापकाळात दात पडतात.  दात नसलेल्या जागी कृत्रिम दात बसविला जातो तो सहजरीत्या काढताही येतो, याला कवळी बसविणे असे म्हणतात.) 

दंतसफाई  २०,००० (वर्षातून एकदा नागरिकांनी दातांची सफाई करावी. अनेकदा दाताच्या वरच्या बाजूला पिवळसर थर साचलेला असतो, यासाठी दातांची सफाई गरजेची असते.)

आमच्या रुग्णालयात दातांशी निगडित व्याधींवरील सर्व प्रकारचे अत्याधुनिक  उपचार होत असल्यामुळे  शहर, उपनगरे तसेच  मुंबईबाहेरील अनेक रुग्ण येथे दंत उपचारासाठी येत असतात. वर्षभरात आमच्याकडे जवळपास ३१ हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत. वर्षागणिक रुग्णांचा आकडा वाढत आहे.   - डॉ. डिंपल पाडावे, अधिष्ठाता, शासकीय दंत रुग्णालय, मुंबई 

खासगी रुग्णालयात किंवा क्लिनिकमध्ये दातांच्या उपचारासाठी भरमसाट खर्च येतो. त्या तुलनेने या सरकारी रुग्णालयांत कमी दरात दातांवर उपचार केले जातात. विशेष म्हणजे या रुग्णालयात पदवी दंत अभ्यासक्रमासोबत, पदव्युत्तर अभ्यासक्रम असल्याने मूलभूत दंत उपचारासोबत अत्याधुनिक शस्त्रक्रिया केल्या जातात.