(Image Credit : lifealth.com)
अनेकांना पोटात गॅस तयार होण्याच्या समस्येचा खूप जास्त त्रास होतो. चारचौघात यामुळे अनेकांना लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो. गॅसमुळे तुमच्या पचनक्रियाही बिघडू शकते. एक व्यक्ती दिवसातून जास्तीत जास्त १४ ते २३ वेळा गॅस बाहेर सोडतात. अनेकदा लोक गॅस निघण्याच्या समस्येला गंमतीत घेतात आणि दुर्लक्ष करतात. पण रोज गॅस सोडण्याच्या या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काय करावे हे सांगत आहोत.
पोटात गॅस तयार झाल्याची लक्षणे आणि याने होणारे आजार
पोटात गॅस तयार होत असल्याने आणि गॅस बाहेर न आल्याने मळमळ होणे, काही खाल्यनंतर पोट जास्त जड वाटणे, जेवण न पचने, भूक कमी लागणे, पोट जड होणे आणि पोट साफ न होणे ही लक्षणे दिसतात. तसेच गॅस पोटात रोखणे अनेक रोगांना आमंत्रण देण्यासारखंच आहे. यात अॅसिडिटी, पोट दुखमे, डोकेदुखी, मळमळ होणे आणि अस्वस्थ यांचा समावेश होतो. फार जास्त वेळ गॅस रोखून ठेवणेही गंभीर ठरु शकते.
पोटात गॅस तयार होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय
व्यायाम करा
तुम्ही जितके जास्त हालचाल कराल, व्यायाम कराल तुमच्या पोटातील गॅस बाहेर येईल. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी एक्सरसाईज करणे फार गरजेचे आहे. योगाभ्यास आणि ध्यान केल्यानेही पोटात गॅस तयार होत नाही. आठवड्यातून कमीत कमी चार दिवस ३० ते ६० मिनिटे व्यायाम अवश्य करा.
फायबरचं सेवन करा
पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या आणि ड्राय फ्रूट्सचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण काही भाज्यांमुळेही पोटात गॅस निर्माण होते. जसे की, फ्लॉवर, ब्रोकली, स्प्राउट्स इत्यादीमुळे गॅस तयार होते. या पदार्थांचं सेवन जास्त करु नये.
डेअरी प्रॉडक्टमुळे
काही लोकांमध्ये लॅक्टोस पचवण्याची क्षमता नसते. लॅक्टोस डेअरी प्रॉडक्टमध्ये आढळतात जसे की, दूध, पनीर, दही या हे असतं. याच कारणाने गॅस तयार होते. जर तुम्हालाही ही समस्या होत असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
औषधांमुळेही समस्या
जर तुम्ही नियमीतपणे एखाद्या आजाराचे औषधे खात असाल किंवा पेनकिलर खात असाल तर तुम्हाला गॅसची समस्या होऊ शकते. या समस्येमुळे तुम्हाला अधिक त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घ्यावे.
इतरही कारणे
गॅसमुळे तुमच्या शरीराच्या स्थितीबाबतही माहिती मिळते. लिवरवर सूज, गॉल ब्लेडरमध्ये स्टोन, फॅटी लिवर, अल्सर किंवा जाडेपणामुळेही गॅस होते.