सॉल्ट थेरपी हा एक नैसर्गिक उपाय आहे. याला सॉल्ट रूम थेरपी आणि हेलो थेरपी असंही म्हटलं जातं. या थेरपीचा फायदा लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत होऊ शकतो.
काय आहे सॉल्ट थेरपी?
सॉल्ट थेरपीसाठी एका रूममध्ये मिठाचं स्ट्रक्चर तयार केलं जातं. त्यामुळे याला सॉल्ट रूम थेरपी असं म्हणतात. याला तुम्ही मिठाची गुहा देखील म्हणू शकता. ही थेरपी पूर्णपणे ड्रग फ्री असते. म्हणजे या कोणतंही औषध दिलं जात नाही. मिठामुळे तयार झालेलं तापमान आणि जलवायु नियंत्रण करून ठेवलं जातं. यात लोकांना जवळपास ४५ मिनिटांपर्यंत ठेवलं जातं. या रूममध्ये जाऊन व्यक्तीला झोपून किंवा बसून आराम करण्यास सांगण्यात येतं. दरम्यान लोक श्वास घेताना त्यांच्या श्वासनलिकेत मिठाचे कण पोहोचतात. जे फुप्फुलासा होणारं इन्फेक्शन दूर करण्यास फायदेशीर ठरतात.
कशी तयार केली जाते रूम?
- हेलो थेरपीसाठी तयार केलेल्या रूममध्ये जवळपास ८ ते १० टन मिठाचा वापर केला जातो. ज्यात एकत्र ६ लोकांना ठेवलं जातं.
- हेलो थेरपीच्या रूममध्ये तापमान १८ ते २२ डिग्री सेल्सिअस दरम्यान ठेवलं जातं.
- होले जनरेटरच्या माध्यमातून फार्माग्रेट सोडिअम क्लोराइड युक्त हवा सोडली जाते. जी रूममधील मिठांच्या कणांना छोटे छोटे करून हवेत एकरूप होऊ देते आणि नंतर श्वास घेण्याच्या क्रियेदरम्यान शरीरात प्रवेश करतात.
(Image Credit : woodlandsonline.com)
- ब्रीज टॉनिक प्रो ने मिठ विरघळत नाही.
- याला रूमला असं डिझाइन केलं जातं की, एका तासाच्या सेशनमध्ये लोकांच्या श्वासांमध्ये केवळ १६ एमजीच मिठाचे कण जातात.
ही थेरपी ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी फायदेशीर मानली जाते. हेलो थेरपीची ही टेक्निक सर्वातआधी १८४३ मध्ये समोर आली होती. तेव्हा पॉलिश हेल्थ अधिकाऱ्यांना आढळलंकी, पोलंडमध्ये मिठाच्या खाणींमध्ये काम करणाऱ्या मजुरांना कोणत्याही प्रकारची श्वास घेण्याची समस्या नव्हती.
कोरडी सॉल्ट थेरपी
(Image Credit : pinterest.com)
कोरड्या सॉल्ट थेरपीमध्ये लोकांना मिठाच्या एका रूममध्ये ठेवलं जातं. ही रूम एक्सपर्ट द्वारे तयार करण्यात आली. यात जेनर नावाच्या उपकरणाने मीठ बारीक केलं जातं आणि नंतर मिठाचे सूक्ष्म कण रूममध्ये पसरवले जातात. ते हवेत मिश्रित होतात आणि श्वासांच्या माध्यमातून फुप्फुसात प्रवेश करतात.
या थेरपीमध्ये फुप्फुसातील इन्फेक्शन आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. श्वासनलिका आणि फुप्फुसांमधील सूज कमी होते. फुप्फुसाची स्वच्छताही होते. याने कफ पातळ होतो आणि शरीरातील विषारी पदार्थही बाहेर निघतात. या थेरपीने झोपेची समस्याही दूर होते.
कशी दिली जाते ही थेरपी?
हेलो थेरपी दरम्यान व्यक्तीला जवळपास ४५ मिनिटांपासून ते एक तास मिठाच्या रूममध्ये लेटून रहावं लागतं. दरम्यान त्यांना आरामदायक कपडे दिले जातात. तसेच रूममधील प्रकाश कमी ठेवला जातो. काही प्रकारच्या सॉल्ट थेरपीमध्ये लोकांना कपड्यांविनाच रूममध्ये ठेवलं जातं.
हेलो थेरपीचे फायदे
सॉल्ट थेरपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिठात कॅल्शिअण, सोडिअम आणि मॅग्नेशिअमसारखे मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. ही हेलो थेरपी व्यक्तीचं वय आणि त्यांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार दिली जाते. फार गंभीर आजार किंवा स्थितीत ही थेरपी दिली जात नाही.सॉल्ट थेरपीने इन्फेक्शपासून सुटका मिळते, मांसपेशींमधील वेदना कमी होतात, स्ट्रेस कमी केला जातो, त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात, अस्थमातही याचा फायदा होतो,
काय सांगतो रिसर्च?
(Image Credit : breathesaltrooms.com)
२००७ मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले की, सॉल्ट रूम थेरपीचे दोन ते चार सेशन घेतल्यावर क्रोनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीजच्या रूग्णांमध्ये बरीच सुधारणा बघायला मिळते. पण तरी सुद्धा ही थेरपी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये असा सल्ला दिली जातो.