आजच्या काळात जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या फोनपासून आठवडाभर दूर राहण्याचं आव्हान दिलं तर ते त्या व्यक्तीसाठी जगातील सर्वात मोठं दुःख असेल. आजकाल बहुतांश लोकांना स्मार्टफोनचे व्यसन लागलं आहे. एका रिसर्चनुसार, अमेरिकेतील लोक दिवसातून ८ अब्ज वेळा स्मार्टफोन तपासतात.
नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, प्रत्येक व्यक्ती दररोज ४६ वेळा आपला स्मार्टफोन वापरतो. 'नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी'ने अलीकडेच केलेल्या रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की १८ ते ३३ वयोगटातील प्रौढ लोक ८५ वेळा किंवा दर १० मिनिटांनी एकदा स्मार्टफोन वापरताना दिसतात. आजकाल लोक स्मार्टफोन इतका वापरत आहेत की त्यांना स्वतःलाच ते कळत नाही.
फोन वापरणं ही वाईट गोष्ट नाही पण त्याचे दुष्परिणाम लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आजकाल लोकांमध्ये स्क्रीन टाइम खूप वाढला आहे त्यामुळे झोप कमी होते. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लोकांमध्ये नैराश्य येत आहे. बऱ्याच वेळा स्मार्टफोनमुळे लोक त्रस्त होतात. त्यांचं लक्ष विचलित होतं. स्मार्टफोन अनेकदा मृत्यूचं कारण देखील बनू शकतो.
एका सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे की ८४% लोकांनी सांगितलं की ते एक दिवसही स्मार्टफोन सोडू शकत नाहीत. पण तुम्ही तुमचा स्मार्टफोन जितका कमी वापरता तितका ते तुमच्या आरोग्यासाठी आणि मनासाठी चांगलं आहे. कारण फोनचा जास्त वापर शरीरासाठी घातक ठरू शकतो.
बॅक्टेरियामुळे उद्भवू शकतात समस्या
स्मार्टफोन टॉयलेट सीट एवढाच खराब असतो असं म्हणतात आणि ते खरं आहे. कारण फोनवरील बॅक्टेरिया मरत नाहीत, उलट त्यावरील बॅक्टेरिया शरीरात जाऊन न्यूमोनिया आणि डायरियाचं कारण ठरतात.
डोळ्यांशी संबंधित समस्या
स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे डोळ्यांशी संबंधित समस्यांनाही बळी पडू शकतो. यातून निघणारी ब्लू लाईट डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे हळूहळू डोळे दुखू लागतात.
मान आणि खांदा दुखतो
फोनच्या अतिवापरामुळे मान आणि खांदे दुखू शकतात. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर करताना आरोग्याची नीट काळजी घ्या.