हर्निया हा आजार शरीरातील एखादं अंग अधिक वाढल्याने होतो. म्हणजे शरीराचा एखादा भाग जर सामान्यापेक्षा अधिक वाढला तर तो हर्निया आहे. हा शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. पण पोटात होणारा हर्निया प्रामुख्याने बघितला जातो. हर्नियामुळे होणाऱ्या वेदना असह्य असतात.
शरीरातील ऊती, इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग शरीरपोकळीतून बाहेर येण्याच्या स्थितीस अंतर्गळ असे म्हटले जाते. साधारणतः हे पोटाच्या भागात आढळून येते. हे जन्मजात किंवा नंतर उद्भवलेले असू शकते. अनेक कारणांमुळे हे उद्भवू शकते, परंतु जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलणे, एखादा खड्डा उडी मारून पार करणे व अनुवांशिकता ही या व्याधीची मुख्य कारणे असतात.
हर्नियामध्ये काय काळजी घ्यावी?
1) कोणतीही वस्तू योग्य पद्धतीने उचलावी. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच वजन उचला.
२) वजन वाढू देऊ नका. वजन वाढल्यास तुमची समस्या अधिक वाढू शकते. जर तुमचं वजन जास्त असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. तज्ज्ञांकडून योग्य आहार प्लॅन करुन घ्या.
३) पोटदुखी तुमची वेदना, त्रास आणि आजार वाढवू शकतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये पचनक्रिया बिघडू देऊ नका. तुमच्या आहारात फायबरचं प्रमाण अधिक वाढवा. सोबतच हलक्या पदार्थांचं सेवन करा.
हर्नियापासून कसा कराल बचाव
- मलाशयाची योग्यप्रकारे स्वच्छता करा.
- जाडेपणा आणि वजन वाढू देऊ नका.
- प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी सप्लीमेंटचं सेवन करा.
- आरामदायक अंडरगारमेंट्सचा वापर करा.
- पोटाच्या मांसपेशींवर अधिक दबाव टाकणारी कामे करु नये.
- वजन संतुलित ठेवले पाहिजे.
- जर पोटाची आणि अपचनाची समस्या असेल तर वेळीच उपाय करा.