आपण हे बऱ्याच ऐकले असावे की, चांगल्या आरोग्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी अनेक लोक साखर न खाण्याचा सल्ला देतात. तसेच मिठाने देखील अंगाला सुज येते आणि यामुळे बीपी वाढतो. त्यामुळे मीठ देखील कमी करण्याचा सल्ला आपल्या दिला जातो. मग असं असेल तर साखर आणि मीठ हे खरोखरच तुमच्या आरोग्याचे शत्रू आहेत का? आणि जर आपण यांना खाण्याचं सोडून दिलं, तर मग खरोखर आपण निरोगी राहू शकतो का? याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या.
शरीर योग्यरित्या कार्य करण्यासाठी, मिठ आणि साखर दोन्ही महत्वाची भूमिका साकारतात. मीठ हे एक खनिज आहे, जे द्रव पातळी आणि आम्ल-बेस संतुलन राखण्यासाठी काम करते. त्याच वेळी, साखर कार्बोहायड्रेटचा एक प्रकार आहे आणि आपल्या दैनंदिन क्रियाकलापांसाठी ऊर्जेचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यामुळे मिठ आणि साखर दोन्हीही आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे.
परंतु अतिरिक्त मीठ आणि अतिरिक्त साखरेचे सेवन आरोग्यावर विपरीत परिणाम करते. पण, तुम्ही योग्य प्रमाणात आहारात मीठ आणि साखर यांचा समावेश केला, तर त्याचं सेवन करणं सुरक्षित आहे. बऱ्याचदा लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात ते किती मीठ आणि साखर वापरत आहेत, याबद्दल त्यांना माहिती नसते. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात यांचं सेवन करा, ज्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधीत कोणतीही समस्या येणार नाही. असे तज्ज्ञ म्हणतात.
मीठ किंवा साखर किती आवश्यक आहे?डब्ल्यूएचओने निरोगी प्रौढांसाठी दररोज ५ ग्रॅम (१ चमचा) पेक्षा कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे. २ ते १५ वयोगटातील मुलांसाठी मिठाची गरज प्रौढांपेक्षा कमी असते आणि त्यांच्या गरजांवर ते अवलंबून असते. तसेच एकूण कॅलरीजपैकी ५-१० टक्क्यांपेक्षा जास्त साखरेचा वापर करणे उचित ठरू शकते. त्यामुळे शक्य तितकं मीठ आणि साखरेला जास्त प्रमाणात खाणं टाळा.