शहरं
Join us  
Trending Stories
1
पूजा दिलीप खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले
2
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
3
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
4
Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...
5
काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा
6
Vidhan Sabha Election: करमाळा-माढा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढली; कारण...
7
सध्या मराठा समाज कुणासोबत महाविकास आघाडी की महायुती? अजित दादांनी स्पष्टच सांगितलं
8
Life lesson: हो! जीवंतपणी स्वर्ग आणि नरक पाहणे शक्य आहे; 'असा' घ्या अनुभव!
9
“सांगली पॅटर्न लोकप्रिय नाही, मित्र पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही अन्यथा...”: संजय राऊत
10
Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेआधी घरातून 'हे' फोटो आधी बाहेर काढा; होऊ शकते आर्थिक नुकसान!
11
प्रेग्नंन्ट आहे दिव्यांका त्रिपाठी, ३९व्या वर्षी होणार आई! दिवाळी पार्टीत फ्लॉन्ट केला बेबी बंप
12
"आजपर्यंत राज ठाकरे नक्कल करायचे, आता...", अजित पवार यांचा शरद पवारांना टोला
13
Gold Price Outlook: पुढच्या दिवाळीपर्यंत सोनं १ लाखांपार जाण्याची शक्यता; चांदीचीही चमक वाढणार
14
Ajit pawar: शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, "राजकारणात काहीही होऊ शकते"
15
दिवाळीतील गुरुवार: इच्छा आहे, पण स्वामी सेवा शक्य होत नाही? ‘अशी’ करा स्वामी समर्थ मानसपूजा
16
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
17
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
18
अखेर तो क्षण आलाच.... तब्बल २८ वर्षांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पुन्हा जुळून येणार योग
19
Swiggy IPO: कधी येणार स्विगीचा आयपीओ, किती आहे प्राईज बँड? ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय, जाणून घ्या

फॅटी लिव्हर म्हणजे काय ?  वेळीच ओळखा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 11:42 AM

सध्याच्या घडीला अशा आजाराचे अनेक नागरिक आपल्या आजूबाजूला हिंडत असतात. कारण आधुनिक जीवनशैलीमुळे हे आजार जास्त प्रमाणात जडल्याचे दिसून येत आहे. संभवतात. काही वेळा हा आजार आनुवंशिक असण्याची शक्यता असते. - डॉ. रवी मोहंका,  लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन 

आपण अनेक वेळा फॅटी लिव्हरच्या आजाराबद्दल ऐकून असतो. त्यावेळी हा आजार केवळ दारू पिणाऱ्या पुरुषांना होतो, असा अनेकांचा समज आहे. मात्र  वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हा आजार केवळ दारू पिण्याऱ्यांनाच होतो हा गैरसमज आहे. मेटाबोलिक सिंड्रोममुळे शक्यतो लिव्हरचा आजार रुग्णांना होत असतो. त्याला वैद्यकीय भाषेत नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीस (एनएएफएलडी) असे म्हणतात. मेटाबोलिक सिंड्रोम म्हणजे विविध आजाराचा चमू, हा सिंड्रोम असलेल्या व्यक्तींना मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, हृदय विकार, उच्च रक्तदाब असे आजार असतात. सध्याच्या घडीला अशा आजाराचे अनेक नागरिक आपल्या आजूबाजूला हिंडत असतात. कारण आधुनिक जीवनशैलीमुळे हे आजार जास्त प्रमाणात जडल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे हा आजार पुरुष आणि महिला दोघांमध्ये आढळून येतो. भारतात एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के व्यक्तींना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर दिसून येते. लिव्हर  हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव असून शरीराच्या उजव्या बरगड्यांमध्ये असतो.  आपली जी पचनक्रिया आहे त्यामध्ये या अवयवाची फार मोठी  भूमिका आहे. पचनसंस्थेतील सर्व क्रिया लिव्हर व्यवस्थित बजावत असतो. शरीरातील पचनसंस्थेपासून ते अनेक कार्य या लिव्हरमार्फतच केले जाते. आपल्या आतड्यांमधून येणाऱ्या अनेक अशुद्ध गोष्टी शुद्ध करण्याचे काम, तसेच रक्त गोठविण्यासाठी  लागणारे घटक आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती अबाधित ठेवण्यासारखे काम लिव्हर या अवयवांकडे आहे. 

फॅटी लिव्हर म्हणजे काय ?सर्वसाधारणपणे शरीरातील चरबी लिव्हरमधून कार्यान्वित होते, पण फक्त पाच टक्के चरबी लिव्हरमध्ये साठवून ठेवली जाते. यापेक्षा जास्त चरबी लिव्हरमध्ये साठवली गेली तर त्याला ‘फॅटी लिव्हर’ असे म्हटले जाते.

लिव्हरच्या कार्यात बिघाड झाल्याची लक्षणे  पोटात पाणी साठणे   पायावर आणि चेहऱ्यावर सूज येणे  रक्ताच्या उलट्या होणे  सतत झोप येणे  गुंगी येणे  दैनंदिन कामे करताना थकवा येणे  मळमळ होणे  भूक कमी होणे  सतत पोटात दुखणे

जागतिक यकृत दिनजनजागृतीसाठी दरवर्षी १९ एप्रिल हा जागतिक यकृत दिन म्हणून साजरा केला जातो. यकृतासंबंधी आजारबद्दल जनजागृती आणि निरोगी यकृताचे महत्त्व या विषयावर चर्चा घडवून आणली जाते.

गेल्या काही वर्षात वैद्यकीय क्षेत्रातील सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या आजराचे किंवा त्यापुढील आजारांच्या पायऱ्यांचे निदान करणे सहज शक्य झाले आहे.  विशेष काही सरकारी रुग्णालयात सुद्धा निदान आणि उपचार केले जातात.लिव्हर फायब्रोसिस झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी सोनोग्राफी सारखीच ‘फायब्रोस्कॅन’ ही तपासणी मोठ्या रुग्णालयात उपलब्ध आहे. यावरून किती प्रमाणात लिव्हरची हानी झाली हे कळण्यास मदत होते. औषधोपचाराने या आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. सिरॉसिस झाल्यानंतर मोठा काळ औषधोपचार आणि पथ्य पाणी पाळण्यात जातो. अनेक वेळा मग डॉक्टरांच्या नियमित फेऱ्या आणि सतत चाचण्या कराव्या लागतात. काही वेळा त्याचे कार्य थांबल्यास मग प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नाही.

मेटाबोलिक सिंड्रोम या आजाराव्यतिरिक्त हेपेटायटिस काविळीचे काही प्रकार किंवा काही दुर्मीळ आजारामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतो. माझ्याकडे जे रुग्ण लिव्हर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्याकरिता येतात,  त्यामध्ये ५५ ते ६० टक्के प्रमाण (एन ए एफ एल डी) रुग्णांचे असते. तर २५ टक्के प्रमाण हे दारूच्या सेव्हनमुळे लिव्हर खराब होऊन त्यांना प्रत्यारोपणाची गरज भासत असलेल्यांचे आहे.  त्यामुळे आपण केवळ दारू पीत नाही, म्हणजे लिव्हरचा त्रास होणार नाही हे डोक्यातून काढून टाका. त्यांनी सुद्धा फॅटी लिव्हर आढळून आल्यास दारू पिणे तत्काळ थांबबावे, अन्यथा धोके संभवतात. काही वेळा हा आजार आनुवंशिक असण्याची शक्यता असते.- डॉ. रवी मोहंका, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन 

लिव्हरचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे. फॅटी लिव्हर अनेक वेळा नागरिकांना तपासणी केल्याशिवाय कळत नाही. फॅटी लिव्हर लोकांना काही त्रास जाणवत नाही, मात्र फॅटी लिव्हर तसाच कायम ठेवल्यास त्याच्यावर काही उपाययोजना नाही केल्यानंतर कालांतराने त्याचे रूपांतर लिव्हर फायब्रोसिस आणि त्यानंतर लिव्हर सिरॉयसिसमध्ये होते. अनेक वेळा लिव्हरचा कॅन्सर होण्याचा धोका असतो.  ज्यावेळी फॅटी लिव्हर आहे हे कळते, त्याचवेळी जर आपल्या जीवनशैलीत योग्य बदल केल्यास फॅटी लिव्हर निघून जाऊ शकतो. त्याकरिता नियमित व्यायाम, योग्य आहार घेणे, जंक फूड टाळणे या गोष्टीचे योग्य पालन झाल्यास फॅटी लिव्हरची समस्या दूर होऊ शकते.डॉ.  गीता बिल्ला, हिपेटोलॉजिस्ट

टॅग्स :Healthआरोग्य