वेगवेगळ्या डाळी भारतीय आहाराचा महत्वाचा भाग असतात. रोज डाळी चपाती किंवा भातासोबत खात खाल्ल्या जातात. डाळ भात तर लोक रोज आवडीने खातात. डाळी जेवढ्या टेस्टी लागतात, तेवढेच त्यांचे आरोग्याला अनेक फायदेही होतात. वेगवेगळ्या डाळींमधून शरीराला भरपूर प्रोटीन मिळतं.
जेव्हा तुम्ही डाळ शिजवता तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की, डाळीवर फेस जमा होतो. जो मानवी शरीरासाठी नुकसानकारक असतो. जास्तीत जास्त लोक या फेसाकडे फार कुणी लक्ष देत नाहीत. पण अनेकांना प्रश्न पडतो की, डाळीवर फेस येतो कुठून? आणि तो शरीरासाठी नुकसानकारक कसा आहे?
डाळीवर फेस येण्याचं कारण
जेव्हा तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये डाळ शिजवता तेव्हा फेस स्पष्टपणे दिसतो. डाळीला जेव्हा उकडी येते तेव्हा साबणासारखा फेस वर जमा होतो. पण जास्तीत जास्त लोक हा फेस काढून टाकण्याऐवजी तशी डाळ खातात. एक्सपर्टनुसार, हा फेस आरोग्यासाठी नुकसानकारक असतो. म्हणून तो काढून टाकला पाहिजे.
एक सिद्धांतानुसार, डाळ शिजवतात येणारा फेस सॅपोनिनपासून तयार होतो. एका रिपोट्सनुसार, डाळींमध्ये सॅपोनिन नावाचं एक ग्लायकोसाइड्स असतं आणि जेव्हा ते पाण्याच्या संपर्कात येतं तेव्हा ते त्यात मिक्स होतं. या सॅपोनिनमध्ये साबणासारखेच गुण असतात. जे उकडल्यावर हवेला आपल्या आत खेचतात आणि फेस तयार होतो.
डाळ उकडल्यावर निघतं प्रोटीन
एका दुसऱ्या सिद्धांतानुसार, डाळ शिजवताना यात आढळणारं प्रोटीन बाहेर निघतं. हवेचे कण बाहेर निघून वर फेस तयार करतात, ज्याला प्रोटीन डिनेचुरेशन (Protein Denaturation) म्हटलं जातं.
डाळीचा फेस किती घातक
डाळीतून निघणारा फेस आरोग्यासाठी नुकसानकारक असतो. कारण याने ग्लाइकोसाइड्सचं नॅचरल स्ट्रक्चर डॅमेज होतं आणि याचं डॅमेज गोष्टीचं सेवन केलं तर शरीराला नुकसान होतं. त्यामुळे जेव्हाही डाळीवर फेस यईल तो काढून टाकावा.
फेस कसा काढाल
जास्तीत जास्त लोक आजकाल डाळ कुकरमध्ये शिजवतात. पण एक्सपर्ट सांगतात की, डाळ नेहमीच कुकरऐवजी पातेल्यामध्ये शिजवावी. जेणेकरून डाळीतील फेस वर येईल आणि तो चमच्या तुम्हाला सहज काढता येईल.