शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

काय आहे लहान मुलांना होणारा 'हँड फूट माउथ' आजार? ज्यामुळे सध्या हैराण झालेत पालक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 1:35 PM

Hand Foot Mouth Disease Symptoms : हा विषाणूजन्य आजार संसर्गजन्य असून स्पर्शातून तो वेगाने पसरत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. या आजाराचा प्रादुर्भाव कोणत्याही ऋतूत होऊ शकतो. उन्हाळा आणि पावसाळ्यात रोगाची शक्यता अधिक असते.

Hand Foot Mouth Disease Symptoms : सध्या राज्यातील काही शहरांमध्ये लहान मुलांमध्ये पसरणाऱ्या ‘हँड, फुट माऊथ डिसीज’ने (Hand Foot Mouth Disease) हैराण केलं आहे. या आजाराचं नाव आहे, ‘एचएफएमडी’ अर्थात ‘हँड फूट माऊथ डिसीज’. या आजारांचे रूग्ण काही प्रमाणात आढळत असून १ ते १० वर्षे वयोगटातील लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांनाही या आजाराची बाधा होऊ शकते. 

हा विषाणूजन्य आजार संसर्गजन्य असून स्पर्शातून तो वेगाने पसरत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. या आजाराचा प्रादुर्भाव कोणत्याही ऋतूत होऊ शकतो. उन्हाळा आणि पावसाळ्यात रोगाची शक्यता अधिक असते. विशिष्ट प्रकारच्या जंतुंच्या प्रादुर्भावाने या आजाराचा फैलाव होतो. 

काय आहेत लक्षणं?

लहान मुलांना ताप येणे, तळहात, तळपाय व तोंडाच्या आसपास आणि घशातून बारीक पुटकुळ्या येणे, त्यांना खाज सुटणे आणि प्रचंड वेदना अशी या आजाराची लक्षणे आहेत. या आजाराची लक्षणे आढळल्यानंतर त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार करणे गरजेचे आहे. साधारणपणे सहा ते सात दिवस या आजाराची लक्षणे असतात. या आजारामुळे आलेले पुरळ बरे झाल्यानंतरही काही दिवस त्याचे डाग जात नाहीत. मात्र, नंतर ते विरळ होतात. उलट्या, मळमळणे, अंगदुखी आणि ताप ही आजाराची प्राथमिक लक्षणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

त्रासदायक बाब म्हणजे, या आजारात लहान मुलांच्या घशात लालसर पुळ्या येतात. त्यामुळे घसा खूप दुखतो आणि खाऊ खाताना, गिळताना त्यांना खूप त्रास होतो. भीतीनं मुलं खाणं सोडतात आणि मुलं तसंच त्यांचे पालकही हैराण होतात. साधारणपणे पाच ते सहा दिवस या पुळ्या अंगावर राहतात.

कसा होतो हा आजार?

हा आजार ‘एन्टरोव्हायरस’ कुटुंबातल्या विषाणूंमुळे होतो. ‘कॉक्सॅकी व्हायरस’, ‘इकोव्हायरस’ आणि ‘एन्टरोव्हायरस’ अशा या व्हायरसच्या पोटजाती आहेत. हा आजार झालेल्या मुलाच्या संपर्कात आलं असता, शिंकांमधून, खोकल्यातून हे व्हायरस पसरू शकतात. रूग्णाने वापरलेल्या वस्तू जसं की, रूमाल, टॉवेल वगैरे दुसऱ्या मुलांसाठी वापरल्यामुळेही हा आजार पसरू शकतो. या आजाराचे विषाणू शरीरात शिरल्यापासून पाच ते सहा दिवसात आजाराची लक्षणं दिसू लागतात. पहिले दोन-तीन दिवस थोडा ताप येतो. सर्दी-खोकलाही थोड्या प्रमाणात होऊ शकतो. मग हातापायावर पुळ्या दिसू लागतात.

या आजाराविरूद्ध कोणतंही नेमकं व्हायरसविरोधी औषध उपलब्ध नाही. त्यामुळे त्या-त्या मुलातल्या लक्षणानुसार उपचार करावे लागतात. उदा, तापासाठी औषध, खाज कमी करायचं औषध, घशाला बरं वाटावं म्हणून औषध इ. प्रतिजैविकांचा या आजारात फारसा काहीही उपयोग नाही.

काय घ्यावी काळजी?

हा आजार दीर्घकालीन परिणाम करणारा किंवा अतीगंभीर नसला तरी त्रासदायक व संसर्गजन्य असल्याने पालकांनी काळजी घेणे व सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरते. पाल्य या आजाराने बाधित असेल तर त्याला शाळेत पाठविणे टाळावे, असेही तज्ज्ञांचे मत आहे. पालकांना या आजाराची लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य