शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

Hepatitis: AIDS पेक्षाही घातक ठरतो हेपेटायटिस आजार, जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 12:30 PM

Hepatitis Causes and Symptoms: हेपेटायटिस एक अशी मेडिकल कंडिशन आहे ज्यात लिव्हरवरील सूज खूप वाढते. ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायझेशन म्हणजे WHO च्या आकडेवारीनुसार, जगभरात साधारण 35.4 कोटी लोक याने ग्रस्त आहेत.

Hepatitis Causes and Symptoms:  हेपेटायटिस हा एक असा आजार ज्याबाबत फार कधी बोललं जात नाही. पण जर या आजारावर वेळीच उपचार केले नाही तर हा आजार एड्सपेक्षाही घातक ठरू शकतो. कारण बऱ्याच लोकांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागतो. हेपेटायटिस एक अशी मेडिकल कंडिशन आहे ज्यात लिव्हरवरील सूज खूप वाढते. ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायझेशन म्हणजे WHO च्या आकडेवारीनुसार, जगभरात साधारण 35.4 कोटी लोक याने ग्रस्त आहेत.

हेपेटायटिसचे प्रकार आणि कसा पसरतो?

हेपेटायटिस ए (Hepatitis A) - दुषित पाणी आणि पदार्थांमुळे पसरतो.

हेपेटायटिस बी (Hepatitis B) - संक्रमित बॉडी फ्लूइडमुळे पसरतो.

हेपेटायटिस सी (Hepatitis C)  - संक्रमित बॉडी फ्लूइडमुळे पसरतो.

हेपेटायटिस डी (Hepatitis D) - संक्रमित रक्ताच्या संपर्कात आल्याने पसरतो.

हेपेटायटिस ई (Hepatitis E) - दुषित पाणी आणि पदार्थांमुळे पसरतो.

हेपेटायटिसची लक्षणे

- त्वचेवर पिवळेपणा

- डोळे पिवळे दिसणं

- नखांचा रंग पिवळा होणं

- सतत थकवा

- फ्लूसारखी लक्षण

- डार्क पिवळ्या रंगाची लघवी येणं

- डार्क पिवळ्या रंगाची विष्ठा येणं

- पोटदुखी

- भूक कमी लागणं

- अचानक वजन कमी होणं

कसा कराल बचाव?

हेपेटायटिस फारच घातक ठरू शकतो. त्यामुळे याचा धोका टाळणं फार गरजेचं आहे. जर असं केलं नाही तर जीव गमवावा लागू शकतो. चला जाणून घेऊ बचावाचे उपाय....

1) वॅक्सीन घ्या

हेपेटायटिसपासून बचावासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आपल्या मुलांना बालपणीच यासंबंधी वॅक्सीन लावा. असं केल्याने हेपेटायटिसचा धोका बराच कमी होतो. पण अजूनही हेपेटायटिस सी आणि ई साठी वॅक्सीन आलेली नाही.

2) व्हायरसपासून बचाव

हेपेटायटिसच्या व्हायरसचं संक्रमण तेव्हा पसरतं जेव्हा एका व्यक्तीच्या शरीरातील फ्यूइड दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात कसंतरी जातं. अशात ज्यांना हा आजार आहे त्यांच्यापासून अंतर ठेवा. यात रेजर, निडल, ब्रश, ब्लडपासून बचाव करणं या गोष्टींचा समावेश आहे. 

3) दुषित पाणी आणि अन्न

नेहमी घरातील स्वच्छ पाण्याचं आणि अन्नाचं सेवन करा. बाहेरचे पदार्थ जास्त खाल तर तुम्ही हेपेटायटिसचे शिकार होऊ शकतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य