चालणं हा सर्वात सोपा आणि कोणत्याही वेळी केला जाणारा व्यायाम आहे. दररोज चालण्याने तुमचं आरोग्य सुधारतं. जे लोक रोज चालतात त्यांना सांधेदुखी, अंगदुखी आणि पाठदुखीपासून आराम मिळतो. चालण्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. नियमित चालण्याने मानसिक आरोग्यही सुधारतं. वजन कमी करण्यासाठी चालत असाल तर अनेक गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. चालताना वेळ, अंतर आणि पावलं यापैकी नेमकं काय लक्षात ठेवावे हे जाणून घेऊया...
व्यायामाप्रमाणेच चालण्याचीही एक विशिष्ट पद्धत असते. जर तुम्ही एखाद्या पॅटर्नला फॉलो करून दीर्घकाळ चालत असाल तर त्यामुळे वेगाने वजन कमी होतं. चालताना हे तीन मुद्दे लक्षात ठेवा.
- सर्वप्रथम, तुम्ही किती किलोमीटर चाललात हे लक्षात ठेवा. - तुम्ही किती वेळ चालता. जसे की तुम्ही 30 मिनिटं चालता किंवा त्यापेक्षा जास्त याला टाईम फॅक्टर म्हणतात.- चालताना तुम्ही किती पावलं चालता, ज्यामध्ये तज्ञांनी एका दिवसात 10 हजार पावलं चालण्याचा सल्ला दिला आहे.
वजन कमी करण्यासाठी नेमकं काय पाहावं?
वजन कमी करण्यासाठी, तुम्ही किती वेळ चाललात हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. चालण्याच्या वेळेवर लक्ष केंद्रित केल्याने दोन फायदे मिळतात जे तुम्हाला पावलं मोजून किंवा अंतरावरून मिळत नाहीत.
जेव्हा तुम्ही वेळेनुसार चालता तेव्हा तुम्ही दररोज चालण्यासाठी फक्त एक वेळ निश्चित करता. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुधारतं. यावेळी तुम्ही सर्व काही सोडून फक्त चालण्यावर लक्ष केंद्रित करा जे जास्त फायदेशीर आहे.
तुम्ही तुमच्या वर्कआउटचा वेळ हळूहळू वाढवू शकता. तुमचा स्टॅमिना वाढल्याने तुम्ही चालण्याचा वेळही वाढवू शकता. तर पावलं मोजून किंवा कॅलरी मोजून तुम्ही स्वतः साठी एक टार्गेट सेट करू शकता.