How to make vegetable : आपल्या रोजच्या आहारात भाज्यांना मुख्य स्थान असतं. वेगवेगळ्या भाज्यांमधून शरीराला अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स, खनिज आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. जे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. वेगवेगळ्या भाज्यांचं सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. तसेच शरीराचं नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सही नष्ट होतात. मात्र, भाज्यांबाबत नेहमीच अनेकांना असा प्रश्न पडतो की, भाज्या कशा पद्धतीने खाल्ल्या तर त्यातून जास्त फायदे मिळतात? भाज्या शिवजण्याची योग्य पद्धत कोणती आहे? असाही प्रश्न अनेकांना पडतो. भाज्या स्टीम करून खाव्या की उकडून खाव्यात? हा तर मुख्य प्रश्न आहे. अशात न्यूट्रिशनिस्ट श्वेता पांचाल यांनी याचं उत्तर दिलं आहे.
भाज्या खाण्याची योग्य पद्धत
डायटिशिअन श्वेता पांचाल यांनी सांगितलं की, "जेव्हा तुम्ही भाजी बनवण्यासाठी किंवा एखादं सूप बनवण्यासाठी भाज्या उकडता तेव्हा भाजीतील पोषक तत्व पाण्यात मिक्स होतात. जर तुम्ही या पाण्याचा वापर एखाद्या वेगळ्या पदार्थात करत असाल तर चांगले पोषक तत्व मिळू शकतात. उकडलेल्या भाज्यांचा फायदा असा मिळतो की, अनेक भाज्यांमध्ये ओक्सालेट्स असतात आणि जेव्हा आपण भाज्या उकडून खातो तेव्हा हे ओक्सालेट्स ८० टक्के कमी होतात".
अशात डायटिशिअनने सांगितलं की, जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर भाज्या तुम्ही उकडूनच खाल्ल्या पाहिजेत. पण याचं एक नुकसान असंही आहे की, ५० टक्के अॅंटी-ऑक्सिडेंट्स या प्रोसेसमध्ये निघून जातात.
पोषक तत्व निघून जाऊ नये म्हणून सगळ्यात चांगली पद्धत ही आहे की, भाज्या स्टीम करून खाव्यात. जेव्हा भाज्या स्टीम करता तेव्हा या गोष्टीची काळजी घ्या की, वापरलं जाणारं पाणी भाज्यांना लागणार नाही. असं झालं तर भाज्या उकडण्यासारखंच होईल. डायटिशिअननुसार, ही पद्धत भाजी बनवण्याची बेस्ट पद्धत आहे. खासकरून ब्रोकली खाण्याची ही बेस्ट पद्धत आहे. ब्रोकली २ मिनिटे स्टीम करा. त्यानंतर त्यावर थोडं मीठ आणि काळी मिरे टाकून सेवन करावं.
तिसरी पद्धत आहे भाज्या तळण्याची. एका पॅनमध्ये तेल टाकून भाज्या काही वेळ परतवून घेतल्या जातात आणि त्यांचं सेवन केलं जातं. यात पोषक तत्व जास्त राहतात. अनेक भाज्यांमध्ये फॅट सोल्यूबल व्हिटॅमिन असतात जे एब्जॉर्ब करण्यासाठी फॅट्सची गरज असते. उदाहरण द्यायचं तर गाजर, रताळीसारख्या गोष्टीमध्ये फॅट सोल्यूबल व्हिटॅमिन भरपूर असतं. या गोष्टी तुम्ही दोन मिनिटे तळूण खाऊ शकता.