आजकाल जास्तीत जास्त लोक मोबाइलचा खूप जास्त वापर करतात. मोबाइलशिवाय त्यांचं एकही काम होत नाही. म्हणजे मोबाइल गरज नसून सवय झाली आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेक आजारही होत आहेत. अशाच एका आजाराबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अनेकदा आपल्या असं वाटतं की, आपल्या मोबाइलची रिंग वाजत किंवा एखादा मेसेज आला आहे. पण असं काही नसतं. अनेकांना माहीत नसेल पण असं वाटणं एक आजार आहे.
दिवसेंदिवस लोकांमध्ये मोबाइलचा वापर वाढला आहे. दर काही सेकंदानी मोबाइल चेक केला जातो किंवा सोशल मीडिया चेक केला जातो. ही आरोग्याच्या दृष्टीने फारच वाईट सवय आहे.
अनेकदा कुठे बसलेले असताना, एखाद्या कार्यक्रमात असताना किंवा गाडी चालवत असतानाही आपल्याला मोबाइल वाजत असल्याचा भास होतो. मोबाइल चेक केला तर ना फोन आलेला असतो ना कुणाचा मेसेज.
काय आहे फॅंटम वायब्रेशन सिंड्रोम?
मुळात मोबाइलची रिंग वाजल्यासारखं किंवा मेसेज आल्याचा अनुभव येणे एकप्रकारचा आजार असू शकतो. मेडिकल सायन्समध्ये याला फॅंटम वायब्रेशन सिंड्रोम म्हटलं जातं. या सिंड्रोमचं कारण आजच्या काळात मोबाइलची जास्त सवय असणं हे आहे.
अशात अनेक आपल्याला या गोष्टीचा भास होतो की, आपल्या मोबाइलची रिंग वाजत आहे. असं एकदा नाही तर अनेकदा वाटू शकतं.
काही रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, काही लोक दर दोन आठवड्यांनी फॅंटम वायब्रेशन सिंड्रोमचे शिकार होतात. जी तुमच्या मेंदुसाठी खूप वाईट स्थिती होऊ शकते.
काय कराल उपाय?
फॅंटम वायब्रेशन सिंड्रोम ही समस्या दूर करण्यासाठी एक्सपर्टनी काही उपाय सांगितले आहेत. जसे की, मोबाइलचा वापर कमी, मोबाइल वापरण्याची पद्धत बदला. तसेच कधी फोन वायब्रेशन ठेवा तर कधी रिंगटोनवर, रिंगटोन काही काळाने बदलत रहा. मोबाइल फोन एकाच खिशात ठेवण्याऐवजी वेगळ्या खिशात ठेवा. मोबाइल वायब्रेशन मोडवर फार जास्त काळ वापरू नका. यातील सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे मोबाइल फोनचा फार जास्त वापर करू नका किंवा सतत मोबाइल चेक करण्याची सवय बंद करा.