Skin Care: शरीरात पाणी झाल्यावर शरीरात वेगवेगळ्या समस्या होतात. मात्र, अनेकदा बरेच लोक भरपूर पाणी पितात, पण तरीही त्यांची त्वचा तजेलदार किंवा चमकदार दिसत नाही. हायड्रेशनच्या कमतरतेमुळे त्वचा कोमेजू लागते ज्यामुळे चेहरा निर्जीव किंवा कोमेजलेला दिसतो. अशात डर्मेटोलॉजिस्ट डॉ. अवेस आरिफ यांनी एक उपाय सांगितला आहे. डॉक्टरांनुसार, एक पांढरी गोष्ट पाण्यात मिक्स करून प्यायल्याने शरीर पाणी चांगल्या पद्धतीने अब्जॉर्ब करतं. ज्यामुळे त्वचेवर ओलावा असतो आणि त्वचा चमकदार दिसते आणि उजळते सुद्धा.
कशी मिळवाल ग्लोईंग स्कीन
डर्मेटोलॉजिस्ट यांचं असं मत आहे की, जर भरपूर पाणी प्यायल्यानंतरही त्वचा उजळलेली दिसत नसेल तर पाण्यात चिमुटभर मीठ टाका. असं केल्याने पाणी शरीरातील कोशिकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचतं आणि त्वचेवर हेल्दी ग्लो दिसू लागतो.
सामान्यपणे असं म्हटलं जातं की, जर पाण्यात थोडं मीठ टाकून सेवन केलं तर हे पाणी नॅचरल लॅक्सेटिव्हसारखं काम करतं. ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते. तसेच शरीरातील विषारी पदार्थही बाहेर निघतात. अशात शरीरातील वेगवेगळे अवयव योग्य पद्धतीने काम करतात. इतकंच नाही तर मिठाच्या पाण्याने गुरळा केल्याने दातांचं आरोग्य चांगलं राहतं. तोंडातील बॅक्टेरिया दूर करण्यासही मदत मिळते.
ग्लोईंग स्कीनचे घरगुती उपाय
- हायड्रेशननंतरही त्वचा कोमेजलेली किंवा निर्जीव दिसत असेल तर इंस्टेंट ग्लो मिळवण्यासाठी तुम्ही घरीच काही उपाय करू शकता. तुम्ही चंदन पावडरमध्ये दूध मिक्स करून एक फेस पॅक बनवू शकता. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर तो धुवून टाका. याने त्वचेवर ग्लो दिसेल.
- तसेच एका वाटीमध्ये बेसन, हळद आणि दही मिक्स करून पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा. नंतर चेहरा धुवून घ्या. याने चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत मिळेल.
- दुधात हळद मिक्स करून चेहऱ्याची मालिश करा. याने त्वचेवरील डेड स्कीन सेल्स निघून जातील आणि मळही दूर होईल. दुधाचा वापर रोज त्वचा स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतो.