Vitamin D : निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणं किती गरजेचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. आपण जे काही खातो त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर दिसतो. वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात. जे आपल्याला आहारातून मिळतात. यातील एक महत्वाचं व्हिटॅमिन म्हणज व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी मिळण्याचा मुख्य स्त्रोत सूर्यकिरणे असतात. त्यामुळे रोज काही वेळ तरी उन्हात बसण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. तसेच उन्ह कमी घेतल्याने सेराटोनिन हार्मोन लेव्हल कमी होते. ज्यामुळे तणाव आणि डिप्रेशनचा धोका वाढतो.
उन्हामुळे रक्तात फॉस्फोरस आणि कॅल्शिअम रेग्युलेट होण्यास मदत मिळते. जे हाडे आणि रक्तासाठी महत्वाचे असतात. हिवाळ्यात तर लोकांना उन्ह इतकं आवडतं की, तासंतास ते उन्हात बसून राहतात. मात्र, उन्हामुळे जरी व्हिटॅमिन डी मिळत असेल तरी टॅनिंगचा धोकाही असतो. इतकंच नाही तर उन्हात जास्त वेळ राहिल्याने त्वचेवर सुरकुत्या, काळे डाग येण्याचा धोका असतो. अशात तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की, उन्हात कोणत्या वेळी आणि किती वेळ बसावं. जेणेकरून वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळेल.
शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाल्यावर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जसे की, ऑस्टियोपोरोसिस, कॅन्सर, डिप्रेशन, मसल्स वीकनेससहीत अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा शरीरात व्हिटॅमिन डी संतुलित प्रमाणात असणं गरजेचं असतं.
उन्हात बसण्याची योग्य वेळ
एक्सपर्टनुसार, हिवाळ्यात सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत उन्हात बसणे सगळ्यात चांगलं असतं. असं केल्याने शरीराला आवश्यक तेवढं व्हिटॅमिन डी मिळतं. मात्र, नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी २ ही वेळ सगळ्यात फायदेशीर असते. हाडांच्या समस्या असणाऱ्या लोकांसाठी दुपारी उन्हात बसणं सगळ्यात बेस्ट मानलं जातं.
किती वेळ बसावं उन्हात?
व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी उन्हात जास्तीत जास्त २० ते ३० मिनिटे इतकाच वेळ बसावं किंवा फिरावं. हार्ड स्कीन असलेल्या लोकांनी यापेक्षा जास्त वेळ उन्हात बसावं. ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ उन्हात बसू नये कारण याने त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.