नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण करण्याची योग्य वेळ कोणती आहे? असं जर कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही अंदाजे वेळ सांगाल. पण तुम्ही धावपळीच्या आयुष्यात या वेळा किती पाळता अस जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर बऱ्याच लोकांचं नाही असंच असेल. तर अनेकांना या सर्वगोष्टींसाठीची नेमकी योग्य वेळ कोणती? हेच माहीत नाही.
आयुर्वेद सर्व लोकांना त्यांच्या मुलांकडून नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याबाबत शिकण्याचा सल्ला देतं. कारण आयुर्वेदानुसार, शाळेत जाणारी मुलं योग्य वेळेचं पालन करतात आणि त्यामुळेच त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो. तसेच याने शरीरात नेहमीच ऊर्जा देखील राहते.
नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?
नाश्त्याची वेळ
सर्वोत्तम वेळ- सकाळी ७ ते ८केव्हा खाऊ नये - १० वाजल्यानंतरलक्षात ठेवा - सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांच्या आत काहीतरी खाणं आवश्यक आहे.
दुपारी जेवणाची वेळ
सर्वोत्तम वेळ - दुपारी १२.३० ते २ दरम्यानकेव्हा खाऊ नये – ४ वाजल्यानंतरलक्षात ठेवा - नाश्ता आणि दुपारचं जेवण यामध्ये ४ तासांचं अंतर असणं आवश्यक आहे.
रात्रीच्या जेवणाची वेळ
सर्वोत्तम वेळ- संध्याकाळी ६ ते ८केव्हा खाऊ नये - रात्री ९ नंतरलक्षात ठेवा - झोपण्याच्या ३ तास आधी जेवावं.
दिल्लीचे नॅचुरोपॅथ नागेंद्र अमुल्य सांगतात की, साधारणपणे, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या शाळेच्या वेळेमुळे, मुलं जवळपास सारखच रुटीन फॉलो करतात, पण अनेकदा पालक त्यांचा दिनक्रम बिघडवतात. अशा परिस्थितीत, घरातील सर्व लोकांनी देखील नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याची योग्य वेळ पाळा, जेणेकरून रोगांपासून दूर राहता येईल.
'हे' आहेत फायदे
जर तुम्ही दररोज योग्य वेळी अन्न खाल्लं तर तुम्ही निरोगी राहता. तसेच थकवा, तणाव, चिडचिड अशा शारीरिक आणि मानसिक समस्याही होत नाहीत आणि तुम्ही कायम आनंदी राहता. तुमच्या शरीराला ठराविक वेळी दिलेलं अन्न मेटबॉलिज्म वाढवतं. दररोज चुकीच्या वेळी आणि वेगवेगळ्या वेळी खाल्ल्याने तुमचं शरीर अशक्त होऊ शकतं.