Tea Habit Reason : जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात गरमागरम चहाने होते. काही लोक दिवसातून केवळ दोनदा म्हणजे सकाळी आणि सायंकाळी चहा घेतात. तर काही लोक दिवसातून अनेक कप चहा पितात. अनेक लोकांना चहाची सवय झाली असते. त्यांना चहा मिळाला नाही तर त्यांचं डोकं दुखू लागतं. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, चहा पिण्याची सवय कशी लागते? यासाठी काय कारणीभूत असतं? हेच आज जाणून घेणार आहोत.
कशी लागते चहा पिण्याची सवय?
चहामध्ये कॅफीन नावाचं तत्व असतं. कॅफीन हे सवय लावणारं एक तत्व आहे. या तत्वामुळेच तुम्हाला चहा पिण्याची नेहमी नेहमी ईच्छा होते. अशात चहा मिळाला नाही तर चिडचिड वाढते, डोकेदुखी होते, हृदयाचे ठोकेही वाढतात तसेच थकवा जाणवू लागतो. काही लोकांना चहाची एकप्रकारे नशा येते. एक महिना चहा सोडला तर कॅफीन सवय कमी करता येऊ शकते.
चहामध्ये अॅसिड बनवण्याची क्षमता
चहा हा अॅसिडिक नेचरचा असतो. म्हणजे चहा प्यायल्याने पोटात अॅसिड तयार होतं. जर आधीच पोटात जास्त अॅसिड असेल तर चहाने अॅसिड अधिक जास्त वाढतं. पोटात जर अॅसिड वाढलं तर वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. त्यामुळेच चहाचं जास्त सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.
१ महिना चहा सोडल्यावर होणारे फायदे
स्ट्रेस दूर होईल
अनेकजण स्ट्रेस कमी करण्यासाठी अनेक कप चहा पितात. पण चहामध्ये भरपूर प्रमाणात कॅफीन हे तत्व असतं. याचं जास्त सेवन केल्याने स्ट्रेस वाढतो. अनेक झोप न लागण्याची समस्या देखील होते. अशात तुम्ही एक महिना चहा बंद केला तर तुमचा स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळेल.
पचन तंत्र चांगलं होईल
चहाचं जास्त सेवन केल्याने पचन तंत्रावर वाईट प्रभाव पडतो. अशात तर तुम्ही एक महिना चहा न पिण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला अॅसिडिटी, ब्लोटिंग, छातीत जळजळ अशा समस्या होणार नाहीत.
चांगली झोप येईल
एक्सपर्ट सांगतात की, चहाचं जास्त सेवन केल्याने झोप प्रभावित होते. याला कारण चहामधील कॅफीन हे तत्व असतं. जर तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल तर एक महिना चहा सेवन बंद करून बघा. याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारेल.
चहा पिताना टाळायच्या चुका
रिकाम्या पोटी चहाचं सेवन
बरेच लोक झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटीच चहाचं सेवन करतात. ही सवय तुमच्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकते. असं केल्याने ब्लोटिंग, गॅस, अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. कधी कधी आंबट ढेकरही येऊ शकते. छातीत जळजळ होते.
चहामध्ये जास्त मसाले
लवंग, वेलची, आले आणि दालचीनी यामुळे नक्कीच चहाची टेस्ट वाढते. पण हेही लक्षात ठेवा की, हे मसाले गरम असतात. त्यामुळे यांच्या जास्त सेवनाने वात, पित्त आणि कफाची समस्या होऊ शकते. पावसाळ्यात यांचा जास्त वापर कमी प्रमाणात करा.
चहा जास्त वेळ उकडणे
या दिवसात सगळ्यांनाच कडक चहा हवा असतो. पण चहा जास्त वेळ उकडल्याने आरोग्याचं मोठं नुकसान होतं. याने पचन तंत्र बिघडतं, सोबतच जास्त उकडल्याने कॅफीनचं प्रमाण वाढतं ज्यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे ही चूक टाळा.
जास्त चहा पिऊ नका
पावसांच्या सरींसोबत गरमागरम चहा सगळ्यांना हवाहवा वाटतो. पण चहाच्या जास्त सेवनामुळे नुकसानच होतं. जास्त चहा घेतल्याने शरीरात आयर्नला अवशोषण करण्याची क्षमता घटते, जे चहातील टॅनिनमुळे होतं. त्यामुळे काळजी घ्या की, दिवसातून एक किंवा दोन कपांपेक्षा जास्त चहा चांगली बाब नाही.
जेवण केल्यावर चहा
अनेक लोकांना जेवण केल्यावर चहा पिण्याची चुकीची सवय असते. जर तुम्हीही या दिवसात दोन कपांपेक्षा जास्त चहा पित असाल तर हे आरोग्यासाठी फार नुकसानकारक आहे. यामुळे पचनासंबंधी समस्या वाढतात आणि शरीरात आयर्न व प्रोटीनच्या अवशोषणात अडथळा येतो.