आयुर्वेदात मधाचे आरोग्याला होणारे अनेक फायदे सांगितले आहेत. यात असणाऱ्या औषधी गुणांमुळे मधाला आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी चांगलं मानलं जातं. याच कारणाने अनेक समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार म्हणून याचा वापर केला जातो.
मात्र, मधाचे फायदे मिळवण्यासाठी याचा योग्यपणे वापर करणं फार गरजेचं असतं. एक्सपर्ट्सनुसार, याचं चुकीच्या पद्धतीने सेवन केलं तर आरोग्याला नुकसानही होऊ शकतं.
मधाचे शरीराला होणारे फायदे
डॉक्टर दीक्षा भावसार यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मधाच्या फायद्यांबाबत सांगितलं आहे. यात त्यांनी लिहिलं की, मधाला बेस्ट आयुर्वेदिक फॅट बर्नर म्हणून ओळखलं जातं. डोळ्यांसाठीही याचे खूप फायदे होतात. याने तहान भागवण्यापासून ते कफ दूर करणे, ब्रोन्कियल अस्थमा आणि खोकलाही दूर होतो. तसेच मध एक नैसर्गिक डिटॉक्सीफायरसारखं काम करतं. हार्ट हेल्थपासून ते त्वचा सुंदर करण्यासाठीही याचा वापर केला जातो. हे फायदे मिळवण्यासाठी याचं योग्य पद्धतीने सेवन करणं गरजेचं आहे.
काय काळजी घ्यावी?
मधात अनेक औषधी गुण असतात. जर हे इतर जडीबूटींमध्ये मिक्स केलं तर याचे फायदेही डबल होतात. पण मधाचं सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे. चला जाणून घेऊ त्याबाबत...
मध कधी गरम करू नका
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मध कधीही गरम करू नका. मध गरम केल्याने पचनक्रियेत मदत करणारे एंझाइम नष्ट होतात. यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात.
उष्ण गोष्टींसोबत सेवन टाळा
काही लोक सकाळी झोपेतून उठल्यावर गरम पाण्यात मध टाकून पितात. तर काही लोक हॉट ड्रिंक्समध्ये साखरेऐवजी मध टाकून सेवन करतात. मध गरम पाणी आणि ड्रिंक्समध्ये टाकून प्यायल्याने याच्या फायद्यांऐवजी यापासून नुकसान होऊ शकतं.
या गोष्टींसोबतही टाळा
मधाचं तूप, मस्टर्ड, स्पाइसी फूड, फर्मेंटेड फूड जसे की व्हिस्की, रम, ब्रांडी इत्यादींसोबत सेवन करू नका. बरेच लोक कॉकटेलमध्ये मध टाकून पितात. हे कॉम्बिनेशन योग्य नाही.
कसं करावं सेवन
लठ्ठपणा कमी करण्यासाठी मध गरम पाण्यात टाकून सेवन करण्याऐवजी नॉर्मल पाण्यात टाकून प्या. कफ, कोल्ड, सायनस व इम्यूनिटीसाठी मधाचं सेवन करायचं असेल तर ते हळद, काळे मिऱ्यासोबत घेऊ शकता.