पुरुषांनासुद्धा वयाच्या एका टप्प्यात मानसिक आधाराची गरज असते. कारण शरीरात अनेक हार्मोनल बदल झालेले असतात. यामुळे चिडचिड आणि नैराश्य येतं. मेनोपॉज हा फक्त महिलाांची मासिक पाळी बंद होण्यासंबंधातील असतो, असं नाही तर पुरूषांच्या आयुष्यात सुद्धा मेनोपॉज असतो. फक्त खूप कमी लोकांना याबाबात माहिती असते. पुरुषांमध्ये मोनोपॉजची प्रक्रिया कशाप्रकारे होते, आणि याचा शरीरावर काय परिणाम होते. याबाबत आम्ही सांगणार आहोत.
वयाचं अंतर
महिलांमध्ये सर्वसाधारणपणे मेनोपॉजची स्थिती ४५ वर्षांनंतर येते. मेनोपॉजची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी २ वर्षांचा कालावधी लागतो. तर काही महिलांना १० वर्षांचा कालावधी सुद्धा लागतो. प्रत्येकाच्या शारीरिक स्थितीवर मेनोपॉजची स्थिती अवलंबून असते. हार्मोनल इम्बॅलेंसमुळे असा बदल होतो.
पुरूषांमध्ये मेनोपॉजची स्थिती ५० ते ६० या वयोगटात येते. महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात सुद्धा हार्मोन्सच्या बदलांमुळे हा बदल होतो. कॅल्शियम, व्हिटामीन्स, पोषक आहारातील कमतरता जाणवू लागते. ५० ते ६० या वयात पुरूषांच्या शरीरातील इस्ट्रोजनचं प्रमाण कमी झालेलं असतं. म्हणून मेनोपॉज येतो.
(image credit- CNN.com,thinkstock)
तुलनेने चिडचिड जास्त होणं, एकटेपणा, उदास वाटणं ही स्थिती उद्भवते. या काळात महिलांप्रमाणे पुरुषांना सुद्धा मानसिक आधाराची गरज असते. मेनोपॉजच्या काळात पुरुषांना कॉर्डियोवॅस्कुलर डिजीज, पचनशक्ती मंदावणे, मूड स्विंग्स बदलणं, हाडं कमकुवत होणं अशा समस्यांचा सामना करावा लागतो.
(image credit- healthy balance)
अशी घ्या काळजी
या समस्येवर उपाय म्हणून पुरुषांनी ५० वयानंतर कॅल्शियम, व्हिटामीन्स असलेल्या पदार्थांचे आहारात सेवन करावे. कारण त्यामुळे हाडं मजबूत राहतील. झोप न येण्याची समस्या उद्भवते. त्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. याच काळात डिप्रेशन, मेमरी लॉस असे आजार सुद्धा पुरुषांना होतात. या स्थितीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ताण-तणावमुक्त जीवन जगणं, चांगला आहार घेणं गरजेचं आहे.