हळदीचा वापर भारतीय किचनमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये जवळपास रोज केला जातो. हळदीने पदार्थांना एक वेगळा रंग मिळतो आणि टेस्टही वाढते. सोबतच हळदीमध्ये अनेक औषधी गुणही असतात जे आरोग्याला अनेक फायदे देतात. हळद आपल्या अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट तत्वामुळे ओळखली जाते. आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी हळद फायदेशीर ठरते. तसेच हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं एक तत्व असतं. जे खूप फायदेशीर असतं.
काही रिसर्चनुसार, डिप्रेशन, हायपरलिपिडिमिया आणि अल्झायमर रोगात हळदीचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. हळदीचे अनेक फायदे असूनही काही नुकसानही आहेत. हळदीचं सेवन काही औषधं आणि सप्लिमेंट्ससोबत करणं नुकसानकारक ठरू शकतं.
कॅन्सरची औषधं
करक्यूमिनमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स, अॅंटी-इन्फ्लेमेटीर आणि अॅंटी-कॅन्सर तत्व असतात. याने फ्री रॅडिकल्समुळे सेल्स डॅमेज होण्यापासून बचाव होतो. फ्री रेडिकल्स असे अनस्टेबल मॉलिक्यूल आहेत जे क्रॉनिक हेल्थ कंडीशन विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावतात जसे की, कॅन्सर, हार्ट डिजीज आणि स्ट्रोक. कीमोथेरपीमध्ये वापरली जाणारी औषधं कॅन्सर सेल्सना वाढण्यापासून रोखतात. अशात मानलं जातं की, हळदीमधील अॅंटी-ऑक्सिडेंट कीमोथेरपीच्या औषधांचा प्रभाव कमी करू शकतात. मात्र, यावर तज्ज्ञांचं वेगवेगळं मत आहे. काही म्हणतात की, हळदीने कीमोथेरपी अधिक चांगली होते. त्यामुळे तुम्ही कॅन्सरचे रूग्ण असाल तर हळदीचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
रक्त पातळ करण्याची औषधं
रक्त पातळ करणाऱ्या काही औषधांचा वापर ब्लड क्लॉट आणि कार्डियोवस्कुलर डिजीजसाठी केला जातो. ज्यात स्ट्रोक आणि हार्ट अटॅक यांचा समावेश आहे. हळद रक्त पातळ करणाऱ्या औषधासारखं काम करते. अशात जर हळदीचं सेवन इतर रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत केलं तर ब्लीडिंग किंवा जखम होण्याचा धोका वाढतो. खोकल्यासोबत रक्त येणे, मलत्याग करताना रक्त येणे, गंभीर डोकेदुखी, चक्कर येणे ही गंभीर ब्लीडिंगची लक्षणं आहेत.
ब्लड शुगर कमी करणारी औषधं
हळद आणि करक्यूमिन ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकतं. जर तुम्ही डायबिटीसची औषधं घेत असाल तर तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे. हळदीसोबत ब्लड शुगरची औषधं घेतल्याने ब्लड शुगर लेव्हल कमी होते, ज्यामुळे हायपोग्लाइसीमिया म्हणतात. एका रिसर्चनुसार, टाइप २ डायबिटीसने पीडित लोकांसाठई करक्यूमिनचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. मात्र, यावर अजून शोधाची गरज आहे.
लिव्हर डॅमेज
हळदीच्या सेवनाने लिव्हर डॅमेजचाही धोका होऊ शकतो. सामान्यपणे रोज 250 से 1800 मिलीग्रॅम करक्यूमिनच्या सेवनाने लिव्हरचं नुकसान होतं. लिव्हर डॅमेजच्या उदाहरणांमध्ये हेपेटायटिस, कोलेस्टेटिस सेल्यूलर लिव्हर इंजरी यांचा समावेश आहे.
ऑटोइम्यून डिजीज
ऑटोइम्यून डिजीज जसे की, रुमेटॉइड आर्थरायटिस आणि इन्फ्लेमेटरी बॉवेल डिजीजच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांसोबत हलदीचं सेवन केल्यास नुकसान होऊ शकतं.