Weight Loss :सामान्यपणे वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट घेण्याचा सल्ला दिला जातो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी फळ आणि भाज्यांना बॅलन्स डाएट मानलं जातं. त्यामुळे लोक त्यांच्या आहारात जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचा समावेश करतात. पण यातून एकाची निवड करणं फार कठिण असतं.
फळं आणि भाज्यांमध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू आणि कॅलरी समान असतात. त्यासोबत फळं आणि भाज्यांचे आपापले वेगळे फायदे आहेत. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, वजन कमी करण्यासाठी फळं अधिक खावीत की भाज्या? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर....
नुकत्याच करण्यात आलेल्या पीएलओएस मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, बेली फॅट म्हणजे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मोड आलेलं कडधान्य, ब्रोकली अशा नॉन स्टार्ची भाज्यांचं सेवन करणं फायदेशीर असतं. पण बेरीज, सफरचंद आणि पेर सारखी फळं खाणंही चांगलं मानलं जातं. जर वजन कमी करण्याचा प्रश्न असेल फळं अधिक फायदेशीर आहेत.
रिसर्चमध्ये आढळून आले की, स्मूदी वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर असते. यात अनेक प्रकारची फळं आणि अधिक प्रमाणात फायबर असतं. त्यासोबतच रोज सफरचंद आणि पेराचं सेवन केल्याने जास्तीत जास्त वजन कमी होतं. जर तुम्ही भाज्यांचे शौकीन असाल तर वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये सोया, टोफू, फ्लॉवर आणि पालकाचा समावेश करा.
रिसर्चमधून समोर आले की, वजन कमी करण्यासाठी भाज्यांच्या तुलनेत फळं अधिक फायदेशीर आहेत. फळं सहजपणे पचतात आणि यांचा डाएटमध्ये कधीही समावेश करावा. यात हेल्दी कॅलरी आणि अधिक प्रमाणात अॅंटी-ऑक्सीडेंट आढळतात. फळं खाल्ल्याने भूक कमी लागते आणि दिवसभर पोट भरलं राहिल्याने इतर काही खाण्याची इच्छा होत नाही.
यूनिव्हर्सिटी ऑफ लंडननुसार, डबाबंद फूडचं सेवन केल्याने गंभीर आजार होऊ शकतात. रिसर्चमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, आरोग्यासंबंधी समस्यांपासून वाचण्यासाठी फळांच्या तुलनेत भाज्यांचं सेवन करणं अधिक फायदेशीर असतं. पण याचा अर्थ असा नाही की, फळं आरोग्यासाठी हानिकारक आहेत. रिसर्चमधून निष्कर्ष काढण्यात आला की, वजन कमी करण्यासाठी भाज्यांच्या तुलनेत फळं कमी फायदेशीर आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये भाज्या आणि फळं दोन्हींचा समावेश करा.