वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला फॅट बर्न आणि कॅलरी बर्न हे दोन्ही शब्द चांगलेच माहीत असतील. पण अनेकांना या दोन्हींमधील फरकच माहीत नसतो. अनेकांना असाही प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी फॅट बर्न करणं गरजेचं असतं? की कॅलरी बर्न करणं गरजेचं असतं? मुळात या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मिळवल्याशिवाय तुम्ही वजन कमी करू शकत नाही. कारण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. चला जाणून घेऊ यातील तथ्य....
वजन कमी करण्यासाठी काय आहे गरजेचं?
(Image Credit : rsvplive.ie)
फॅट बर्न असो वा कॅलरी बर्न दोन्ही गोष्टी वजन कमी करण्यासाठी महत्वाच्या आहेत. सामान्य जीवनात दोन्हींचं महत्व यामुळेच कायम झालं आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या दुष्टीने बघाल तर फॅट बर्न म्हणजेच चरबी घटवणं जास्त गरजेचं असतं. पण यासाठीही कॅलरीवर विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. कारण तुम्ही जर आहारातून जास्त कॅलरी घेत असाल तर तुम्ही फॅट बर्न करण्यात यशस्वी होऊ शकणार नाही.
दोन गोष्टीतील फरक
आपण जे काही खातो किंवा पितो त्यातून मिळणाऱ्या कॅलरी शरीर एकतर खर्च करतो नाही तर ज्या कॅलरी शिल्लक राहतात त्या ऊर्जेच्या रूपात शरीरात संग्रहीत राहतात. शरीर आपल्या प्रक्रियेनुसार अतिरिक्त कॅलरीला ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतरित करतो, जे फॅटच्या रूपात जमा होत राहतात.
(Image Credit : linplasticsurgery.com)
जेव्हा तुम्ही शारीरिक मेहनत किंवा एक्सरसाइज करता तेव्हा शरीर तुम्ही लगेच घेतलेल्या कॅलरी किंवा संग्रहीत कॅलरी खर्च करतं. पण जेव्हा या दोन्ही कमी असतात तेव्हा शरीर जमा फॅट खर्च करू लागतं.
(Image Credit : verywellfit.com)
जेव्हा तुम्ही डाएटमध्ये कमी कॅलरी घेता आणि एक्सरसाइज वाढवता, तेव्हा शरीरातील पेशींमध्ये फॅटने शरीराला ऊर्जा मिळते. इथूनच तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागतं.
कसा साधाल बॅलन्स?
वजन कमी करणे किंवा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फॅट आणि कॅलरी बर्न यात योग्य संतुलन गरजेचं असतं. जर तुम्ही योग्य पद्धतीने करू शकले नाही तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शरीराला आवश्यक तेवढ्याच कॅलरी सेवन करा. म्हणजे कमीत कमी कॅलरी घेऊन तुम्ही जास्तीत जास्त फॅट बर्न करू शकता.