- मयूर पठाडेतब्येतीची काळजी घ्यायची म्हणजे सोपी का गोष्ट आहे? काहीही करा तरी कमीच, आणि तब्येतीसाठी काहीही नाही केलं तरी कमीच.साधं चहा कॉफीची गोष्ट घ्या.. कोणी म्हणतं रोज चहा घेतलाच पाहिजे, पण त्याचं प्रमाण मात्र कमी हवं. त्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. काहीजण म्हणतात चहाऐवजी कॉफी केव्हाही चांगली. तर काही जण कॉफीमुळे कॅन्सरचा धोका कसा वाढतो, याची यादी आणि त्याबाबतचे दाखलेच लगेच आपल्यासमोर सादर करतात..साधं कॉफीचं उदाहरण.. त्याबाबतीतही किती समज, गैरसमज.. केव्हा घ्यायची, किती वेळा घ्यायची, घ्यायची की नाही?..पण थांबा, एवढं गोंधळू नका. शास्त्रज्ञांनी त्याबाबतीतलं आपलं कन्फ्युजन बºयापैकी दूर केलं आहे आणि कॉफीचे शौैकिन असणाºयांना चांगलं आश्वस्तही केलं आहे.स्पेनच्या शास्त्रज्ञांनी नुकतंच एक संशोधन केलं. त्यांच्या संशोधनाचा अभ्यास सांगतो, कॉफी पिणं चांगलंच आहे.या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, तुम्ही जर रोज चार कप कॉफी पित असाल, तर हे प्रमाण अतिशय योग्य आणि तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचं आहे. कारण यामुळे कोणत्याही रोगामुळे आजारी पडून दगावण्याचं प्रमाण तब्बल ६४ टक्क्यांनी कमी होतं.तुम्ही यापेक्षा जास्त कॉफी पित असाल, तर मात्र तुमच्या फायद्याचं प्रमाण कमी कमी होत जाईल आणि नंतर त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो.तुम्ही चारऐवजी सहा कप कॉफी रोज पित असाल, तर कोणत्याही रोगामुळे आजारी पडून दगावण्याचं प्रमाण २२ टक्क्यांनी कमी होतं.कॉफी पिणं आणि आजारपण यांचा व्यस्त संबंध आहे, असं त्यांच्या निदर्शनास आलं.यापूर्वी काही शास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास मात्र वेगळंच सांगत होता.आधीच्या संशोधनानुसार तुम्ही जर दररोज पाच कप कॉफी पित असाल, तर तुमच्यात प्रायमरी लिव्हरच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो आणि तुम्ही जर तीन कप कॉफी रोज पित असाल, तर तुमच्यात प्रॉस्ट्यूट कॅन्सरचा धोका वाढू शकतो..आता सांगा, आहे की नाही कन्फ्यूजन? नेमकं काय करायचं? चहा प्यायचा की कॉफी, कॉफी सोडायची की चहा? नेमकं करायचं तरी काय?शेवटी आपलं तारतम्य हेच खरं. ते वापरून ठरवायचं आपण काय करायचं ते..
चहा प्यायचा की कॉफी, चहा सोडायचा की कॉफी, की दोन्ही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 1:28 PM
नवं संशोधन सांगतो, तुम्ही रोज चार कप कॉफी पित असाल, तर ते फारच फायद्याचं आहे, पण जुनं संशोधन सांगतं, त्यामुळे कॅन्सरचा धोका आहे!
ठळक मुद्देनवं संशोधन सांगतं, तुम्ही जर रोज चार कप कॉफी पित असाल, तर कोणत्याही रोगामुळे आजारी पडून दगावण्याचं प्रमाण तब्बल ६४ टक्क्यांनी कमी होतं.तुम्ही यापेक्षा जास्त कॉफी पित असाल, तर फायद्याचं प्रमाण कमी कमी होत जाईल आणि नंतर त्याचा विपरीत परिणामही होऊ शकेल.तुम्ही चारऐवजी सहा कप कॉफी रोज पित असाल, तर कोणत्याही रोगामुळे आजारी पडून दगावण्याचं प्रमाण २२ टक्क्यांनी कमी होतं.जुनं संशोधन मात्र सांगतं, तुम्ही कॉफी पित असाल, तर तुम्हाला कॅन्सरचा धोका होऊ शकतो..