असे अनेक आजार आहेत ज्याची आपल्याला माहितीही नसते. हे आजार झाल्यावर आपल्या लक्षात येतं की असे आजारही आहेत. असाच एक आजार म्हणजे स्विमर्स इअर. या आजाराविषयी तुम्ही पूर्वी कधी ऐकलंही नसेल. काय आहे हा आजार चला जाणून घेऊया. डॉ. अंकूर गुप्ता यांनी ओन्लीमायहेल्थ या संकेतस्थळाला याची माहिती दिली आहे.काय आहे स्वीमर्स इअर हा असा आजार आहे ज्यात स्विमिंग करताना किंवा आंघोळ करताना कानात पाणी गेल्याने इन्फेक्शन होणं. जेव्हा कान जंतूंनी भरलेल्या पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा हे इन्फेक्शन होते. स्वीमर्स इअर तेव्हाच होतो जेव्हा कानात पाणी जास्त असते.
याची लक्षणेकान बंद असल्यासारखा वाटणेकानातल्या नळीत सुज येणेकान लाल होणेकानात खाज येणेकान दुखणेउपायस्वीमर्स इअरपासून बचाव करण्यासाठी पोहताना आपले डोके एका बाजूला झुकवावे.कानात पाणी गेल्यावर दात चावत चावत एका बाजूला झुकावे. कानातील पाणी पडून जाईल.कानात पाणी गेल्यावर कान बंद करून लांब श्वास घ्या आणि सोडा. याने कानातलं पाणी निघुन जाईल.अधिक त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरकडे जा व सल्ला घ्या.