भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीबीसीआयचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुली याला त्याच्या आजारपणामुळे काही दिवसांपूर्वी पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याची तब्येत आता बरी असून त्याला डिस्चार्जही दिला जाईल. डॉक्टरांनुसार, दादाला ट्रिपल वेसल डिजीजची समस्या आहे. आज आपण हा आजार काय आहे आणि एखाद्या व्यक्तीसाठी हा आजार किती घातक ठरू शकतो हे जाणून घेणार आहोत.
२६ जानेवारी २०२१ च्या रात्री सौरव गांगुलीला छातीत वेदना होत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्रास अधिक वाढल्याने त्याला कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दादाची अॅंजियोप्लास्टी करण्यात आली आणि त्याच्या हृदयातील धमण्यांमधील ब्लॉकेज दूर करण्यासाठी २ आणखी स्टेंट लावण्यात आले. आता तो बरा आहे. (हे पण वाचा : लढ्याला यश! फुफ्फुसाच्या उच्च रक्तदाबानं ग्रासलेल्या महिलेवर दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी)
सौरव गांगुलीला २ जानेवारीला कार्डियाक अरेस्टचा झटका आला होता. त्यावेळी तो जिममध्ये ट्रेडमिलवर धावत होता. त्यानंतर त्याला कोलकातातील वुडलॅंड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ७ जानेवारीला त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्याने डॉक्टरांचे आभार मानले होते.
भारतातील प्रसिद्ध हार्ट स्पेशालिस्ट डॉ. देवी शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सौरव गांगुलीची अॅंजियोप्लास्टी करण्यात आली. देवी शेट्टी मेडिकल सायन्सच्या विश्वातील एका प्रसिद्ध नाव आहे. ते एक कार्डियाक सर्जन असून २०१२ मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ( हे पण वाचा : हृदयासाठी अतिशय घातक आहेत रोज खाल्ले जाणारे 'हे' दोन पदार्थ, जीवालाही होऊ शकतो धोका...)
काय आहे अॅंजिओप्लास्टी?
अॅंजियोप्लास्टी हृदयाची एक सर्जरी आहे. याला बॅलून अॅंजियोप्लास्टी आणि परक्यूटेनियस ट्रान्सल्यूमिनाल अॅंजियोप्लास्टी या नावानेही ओळखलं जातं. यात धमण्यांच्या माध्यमातून रक्ताचा सप्लाय ठिक केला जातो. यासाठी धमण्यांमध्ये स्टेंट टाकली जाते.
हार्ट अटॅक कसा येतो?
हृदय हे मानवी शरीरातील एक महत्वाचं अवयव आहे. याच्या माध्यमातून शरीरात सगळीकडे रक्ताचा पुरवठा होतो. हृदयात रक्त धमण्यांच्या माध्यमातून परत येतं. अनेकदा रक्तात कोलेस्ट्रॉल वाढल्याने फॅट वाढतात आणि ते गोठतात. याने आर्टरीजमध्ये अडथळा निर्माण होतो. याला कोरोनरी आर्टरी डिजीज असं म्हणतात. या कारणाने हार्ट अटॅक येतो.
ट्रिपल वेसेल डिजीज काय आहे?
मेडिकल एक्सपर्टनुसार, हा आजार कोरोनरी आर्टरी डिजीजचं एका फार घातक रूप आहे. हृदयात रक्त पोहोचवण्याचं काम ३ मोठ्या धमण्या करतात आणि जेव्हा या तिन्ही धमण्या ब्लॉक होतात तेव्हा याला ट्रिपल वेसेल डिजीज अशा नावाने ओळखलं जातं. यामुळे छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास होतो. ज्याचा परिणाम हार्ट अटॅक येतो.