Walking Speed : चालणं हा आपल्या रोजच्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. कुणी हळू चालतं तर कुणी वेगाने चालतं. प्रत्येक व्यक्तीचा चालण्याचा वेग वेगवेगळा असतो. एक्सपर्ट सांगतात की, वेगाने चालण्याचे फायदे अनेक आहेत. वेगाने चालल्याने वजन कमी करण्यास मदत होते. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, चालण्याच्या वेगावरून हे समजतं व्यक्ती किती लवकर वृद्ध होणार आहे.
याबाबत एक रिसर्च करण्यात आला होता. 'जामा नेटवर्क ओपन' मध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, 45 वर्षांचे असे व्यक्ती जे नैसर्गिक रूपाने हळू चालतात, त्यांच्या मेंदूत आणि शरीरात लवकर वृद्ध होण्याची लक्षणे बघायला मिळतात. या लक्षणांना 19 पातळ्यांवर मोजण्यात आले होते. ज्यांच्या माध्यमातून व्यक्ती वृद्ध झाल्यावर त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं असेल याची टेस्ट केली गेली.रिसर्चमधून समोर आलं आहे की, अशा व्यक्तींना अल्झायमरसारखा गोष्टी विसरण्याचा आजार होण्याचाही धोका जास्त राहतो. सोबतच जे लोक हळू चालतात त्यांच्या लंग्स, दात आणि इम्यून सिस्टीममध्ये वेगाने किंवा मध्यम वेगाने चालणाऱ्यांच्या तुलनेत अधिक समस्या बघायला मिळतात.
इतकेच नाही तर हळू चालणाऱ्यांच्या चेहऱ्यावर वय वाढल्याची किंवा वृद्ध होण्याची लक्षणे दिसू लागतात. आठ लोकांच्या पॅनल द्वारे वेगवेगळ्या लोकांच्या फोटोंवर त्यांची प्रतिक्रिया नोट केल्यावर हा निष्कर्ष काढण्यात आला.
यूएसच्या ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, रिसर्चमधून हैराण करणारे निष्कर्ष समोर आले आहेत. अभ्यासकांनी सांगितले की, लहान मूल जेव्हा तीन वर्षांचं होतं तेव्हा त्यांच्या मेंदूच्या विकासाच्या आधारावर वैज्ञानिक याची माहिती घेऊ शकतात की, ते मध्यम वयात पोहोचल्यावर किती वेगाने चालणार आहेत. सोबतच त्यांचा आयक्यू स्कोर, भाषा समजण्याची क्षमता, मोटर स्किल्स आणि इमोशनल कंट्रोलच्या माध्यमातून याची माहिती मिळवता येऊ शकते. हळू आणि वेगाने चालणाऱ्या लहान मुलांच्या आयक्यूमध्ये १२ अंकांचा फरक बघण्यात आला.
वैज्ञानिकांचं असं मत आहे की, व्यक्ती कशी चालते हे त्यांच्या शरीरावर आणि ते किती निरोगी आहेत यावर अवलंबून असतं. गोष्टी समजून घेणे आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याची क्षमता सुद्धा चालण्याच्या वेगाशी जोडली जाऊ शकते. हेच कारण आहे की, कमी वेग हे दाखवतो की, व्यक्तीच्या ऑर्गनचं कार्य खराब होत आहे. याने ते वेळेआधीच म्हातारे होण्यासोबतच वेगवेगळ्या आजारांचे शिकार देखील होत आहे.