शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रात्री कापलेल्या लिंबावर मीठ लावून बेडजवळ ठेवल्याने काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 12:52 PM

Lemon Under Bed Benefits : आज आम्ही तुम्हाला लिंबाचे काही वेगळे फायदे सांगणार आहोत. जे तुम्हाला माहीत नसतील.

Lemon Under Bed Benefits : लिंबाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. सोबतच याचे आरोग्याला आणि सौंदर्य खुलवण्यातही अनेक फायदे होतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी किंवा एनर्जी मिळवण्यासाठी लिंबू पाण्याचं सेवनही करतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला लिंबाचे काही वेगळे फायदे सांगणार आहोत. जे तुम्हाला माहीत नसतील.

लिंबातील पोषक तत्व

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. जे शरीरातील वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

कसा कराल वापर?

लिंबाचा एक तुकडा बेडजवळ ठेवल्याने शरीर आणि मनाला कितीतरी फायदे होतात. यासाठी तुम्हाला इतकंच करायचं आहे की, लिंबाचा एक तुकडा कापून घ्या आणि त्यावर थोडं मिठ टाका. हा लिंबाचा तुकडा बेडच्या जवळ ठेवा. हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं, पण तज्ज्ञांनी दावा केला आहे की, असं केल्याने फारच चांगले फायदे होतात.

नाक मोकळं होईल

अनेकांना लिंबाचा सुगंध फार आवडतो. याचा सुगंध केवळ रेफ्रिशिंग नाही तर अॅटीं-बॅक्टेरिअलही असतो. जर सर्दीमुळे तुमचं नाक बंद झालं असेल तर रात्री झोपताना बेडच्या बाजूला उशाजवळ कापलेलं लिंबू ठेवा. याने तुम्हाला चांगली झोपही येईल आणि नाकही मोकळं होईल. 

तणाव होईल दूर

लिंबाच्या सुगंधाला डी-स्ट्रेसिंग मानलं जातं. कारण या सुगंधाने तणाव कमी होतो आणि आपल्या इंद्रियांना आराम मिळतो.  जर तुम्हाला फार थकवा जाणवत असेल किंवा तुम्ही तणावात असाल एक लिंबाचा तुकडा तुमची ही समस्या दूर करू शकतो.वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, लिंबाचा सुगंध शरीरात सेरोटोनिन हार्मोनचं प्रमाण वाढवतं. हे सेरोटोनिन हार्मोन चांगल्या झोपेसाठी फायद्याचे असतात. त्यामुळे चांगल्या झोपेसाठी लिंबाचा असा वापर तुम्ही करूच शकता.

माश्या आणि डास पळवा

माश्या आणि डासांना लिंबाचा सुगंध पसंत नसतो. त्यामुळे माश्या आणि डासांनी हैराण झाले असाल किंवा झोपेचं खोबरं होत असेल तर झोपताना जवळ एक कापलेलं लिंबू ठेवा. त्यावर दोन तीन लवंग टोचून लावा. याने तुमच्याजवळ ना माश्या येतील ना डास येतील. कारण लिंबाचा आणि लवंगाचा वास माश्या आणि डासांना आवडत नाही.

इन्सोमेनिया

झोप न येणं ही वेगवेगळ्या गंभीर समस्यांची सुरूवात असू शकते. जर तुम्हाला झोप न येण्याची म्हणजे इनसोमेनियाची समस्या असेल तर हा फंडा तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. याने तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.

घरातील हवेची गुणवत्ता सुधारेल

काही समस्या असली म्हणजेच लिंबाचा असा वापर करावा असं काही नाही. रूममधील हवेची गुणवत्ता चांगली नसेल तर तुम्ही लिंबाच्या तुकड्याचा वापर करू शकता. लिंबाच्या एका तुकड्याने रूममधील हवा फ्रेश होऊ शकते. याने रूममधील हवेची गुणवत्ता सुधारू शकते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य