(Image Credit : business-standard.com)
सध्या देशात कोरोना व्हायरस (Coronavirus News) संक्रमणाची दुसरी लाट थैमान घालत आहे. अशात तिसऱ्या लाटेबाबतही तज्ज्ञांकडून चर्चा केली जात आहे. तिसरी लाट (Coronavirus Third Wave) निश्चित येणार असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. पण कोरोना व्हायरसची (C0ronavirus Wave) ही तिसरी लाट कधी येणार याची कुणीही चर्चा केली नव्हती. मात्र, आता पहिल्यांदाच तिसरी लाट कधी येणार याची शक्यता काही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
केंद्र सरकारचे प्रिन्सिपल सायंटिफिक सल्लागार प्राध्यापक विजय राघवन हे बुधवारी म्हणाले की, दुसऱ्या लाटेनंतर तिसरीही लाट येणार. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, 'तिसरी लाटही येणार. पण कधी येणार आणि किती घातक असणार याबाबत काही सांगितलं जाऊ शकत नाही. कोरोना व्हायरसचे व्हेरिएंट सतत बदलत आहे. त्यामुळे आपल्याला तिसऱ्या लाटेच्या तयारीत रहावं लागेल'. (हे पण वाचा : दिलासादायक! भारतात कोरोना महामारीचं थैमान कधी थांबणार? वैज्ञानिकांनी सांगितली तारीख....)
कधी येणार तिसरी लाट?
कोरोनाची तिसरी लाट कधी येईल? याबाबत बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थमध्ये महामारी तज्ज्ञ डॉ. गिरिधर बाबू म्हणाले की, 'तिसरी लाट हिवाळ्यात येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या अखेरच्या दिवसात किंवा डिसेंबरच्या सुरूवातील ही तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे या संक्रमणापासून ज्यांना सर्वात जास्त धोका आहे, त्यांना वॅक्सीनेट करण्याची गरज आहे'. (हे पण वाचा : देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अटळ, शास्त्रज्ञांचा दावा)
ते असंही म्हणाले की, 'तिसरी लाट तीन गोष्टींवर अवलंबून आहे. पहिली तर ही की डिसेंबरपर्यंत आपण किती लोकांना वॅक्सीनेट करतो. दुसरी ही की, सुपर स्प्रेडर इव्हेंट आपण किती रोखू शकतो आणि तिसरी म्हणजे आपण किती लवकर व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटची ओळख पटवू शकत आणि त्याला रोखू शकतो'.
कोरोनाची तिसरी लाट आल्यावर काय होऊ शकतं?
यावर मॅथमॅटिक मॉडल एक्सपर्ट प्राध्यापक एम. विद्यासागर म्हणाले की, 'दुसऱ्या लाटेत जास्त लोक संक्रमित होत आहेत. यात ते लोकही आहेत ज्यांची टेस्ट होत नाहीये किंवा एसिप्म्टोमॅटिक आहेत. पण ते संक्रमित आहेत. अशात जे संक्रमित होत आहेत त्यांच्यात कमीत कमी सहा महिन्यांसाठी व्हायरस विरोधात इम्युनिटी राहील. पण त्यानंतर इम्युनिटी कमजोर पडू शकते. त्यामुळे वॅक्सीनेशन प्रोग्राम वेगाने व्हायला हवा. ६ महिन्याच्या आत हाय रिस्क असलेल्या लोकांना वक्सीन दिली गेली पाहिजे. जेणेकरून तिसरी लाट दुसऱ्या लाटेसारखी भयावह असू नये'.