शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

कोणता भात चांगला? तपकिरी कि पांढरा? तज्ज्ञांनी दुर केले गैरसमज, सांगितलं सत्य; घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 5:48 PM

लोकांच्या मनात अनेकदा गोंधळ होतो की पांढरा तांदूळ आणि तपकिरी तांदूळ कोणता? एक तांदूळ दुसर्‍यापेक्षा खरोखरच चांगला आहे की फक्त एक मान्यता आहे. न्यूट्रिशनिस्ट भुवन रस्तोगी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केली आहे.(Best Rice)

आपल्या देशात तांदूळ आवडणाऱ्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. दक्षिण भारतात रोट्यापेक्षा याला जास्त प्राधान्य दिले जाते. कारण तांदळात अनेक पोषक घटक असतात, जे शरीरासाठी आवश्यक मानले जातात. पण लोकांच्या मनात अनेकदा गोंधळ होतो की पांढरा तांदूळ आणि तपकिरी तांदूळ कोणता? एक तांदूळ दुसर्‍यापेक्षा खरोखरच चांगला आहे की फक्त एक मान्यता आहे. न्यूट्रिशनिस्ट भुवन रस्तोगी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केली आहे.(Best Rice)

पांढरा आणि तपकिरी तांदूळ म्हणजे काय ? पोषणतज्ञ भुवन यांनी लिहिले, सर्व पांढरे तांदूळ पॉलिश होण्यापूर्वी ते तपकिरी असतात. फक्त पॉलिश न केलेला तांदूळ ब्राऊन राईस म्हणून विकला जातो. तपकिरी तांदूळ संपूर्ण धान्य आहे तर पांढरा तांदळावर प्रक्रिया केली जाते. तांदळाच्या दाण्याला पॉलिश केल्यावर त्यातील कोंडा आणि कोंबांचा काही भाग काढून टाकला जातो. तांदळाचा अंकुरलेला भाग हा एक भाग आहे ज्यामध्ये भरपूर खनिजे असतात आणि कोंडा फायबरने समृद्ध असतो. पॉलिश केल्यानंतर पांढऱ्या तांदळातून फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे काढून टाकली जातात.

तपकिरी आणि पांढरा तांदूळ कोणता चांगला आहे ? पोषणतज्ञ भुवन यांनी पुढे लिहिले की 'शिजवलेल्या पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ७० पेक्षा जास्त आणि तपकिरी तांदळाचा ५० पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा की पांढर्‍या तांदळाच्या तुलनेत तपकिरी तांदूळ रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवत नाही आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. तथापि, फायबरच्या कमतरतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

भुवन सांगतात की, बहुतेक लोक जेवणात फक्त पांढरा भात खाणे पसंत करतात, त्यामुळे आवश्यक प्रमाणात फायबर शरीरात पोहोचत नाही. म्हणून, आपण आपल्या आहारात कोणत्याही गोष्टीचा समावेश करू नये, ज्यामध्ये फक्त कॅलरीज असतात आणि कोणतेही पोषक तत्व नसतात.

ब्राऊन राइसला प्राधान्य देणे आवश्यक आहे :- न्यूट्रिशनिस्ट भुवन यांनी शेवटी लिहिले की, ' १९व्या दशकाच्या सुरुवातीला ब्राऊन राईसच्या तुलनेत जास्त पांढरे तांदूळ खाल्ल्याने बेरीबेरी रोगाचा प्रसार होऊ लागला, कारण त्यामुळे लोकांमध्ये व्हिटॅमिन बी1ची कमतरता निर्माण झाली. विशेषतः त्या लोकांमध्ये ज्यांचे मुख्य अन्न भात होते. त्यामुळे पांढऱ्या तांदळापेक्षा तपकिरी तांदळाला प्राधान्य देणे हा आरोग्याचा कल नसून तो आपल्या मुळांकडे परतण्याचा एक मार्ग आहे.'

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स