Gallbladder Causes Foods : किडनी स्टोनबाबत तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण पित्ताशयाच्या स्टोनबाबत फार कमी लोकांना माहीत असतं. पित्ताशयातील स्टोन एक डाजेस्टिव डिसऑर्डर आहे. याला सामान्यपणे गॅलस्टोन असंही म्हणतात. ही एक गंभीर समस्या आहे. ज्याने अनेक लोक प्रभावित असतात.
पित्ताशय लिव्हरच्या मागच्या बाजूला असतं. ज्यातील पित्त अन्न पचनासाठी गरजेचं असतं. पण काही पदार्थ यात जाऊन स्टोनसारखे जमा होतात. अशात असह्य वेदना, ताप, काविळ, पिवळी लघवी, जेवण केल्यावर पोटदुखी, विष्ठेचा रंग बदलणे अशी लक्षण दिसू लागतात. जर स्टोनची आकार मोठा झाला तर ते काढण्यासाठी ऑपरेशन हा एकमेव उपाय राहतो. ज्यासाठी तुम्हाला 40 ते 50 हजार रूपये खर्च येऊ शकतो. अशात यापासून बचाव करण्यासाठी कोणते पदार्थ टाळले पाहिजे हे जाणून घेऊ.
कोणते पदार्थ टाळावे?
जास्त फॅट असलेले पदार्थ जसे की, तळलेले स्नॅक्स, फास्ट फूड आणि जास्त क्रीम असलेले पदार्थ पित्ताशयात स्टोनचा धोका वाढवतात. या पदार्थांमुळे पित्ताचा स्राव प्रभावित होते, ज्यामुळे पित्ताशयात ठोस पदार्थ तयार होण्याचा धोका वाढतो.
मैदा आणि रिफाइंड कार्ब्स
पांढरे ब्रेड, पास्ता आणि इतर रिफाइंड कार्बोहायड्रेट्स पित्ताशयासाठी नुकसानकारक ठरतात. हे खाद्यपदार्थ लवकर पचतात आणि शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढवू शकतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची लेव्हलही वाढते. जास्त काळ यांचं सेवन केल्याने पित्ताशयात स्टोनचा धोका वाढतो.
शुगर असलेल ड्रिंक
कोल्ड ड्रिंक्स आणि इतर गोड पेय पित्ताशयाच्या स्टोनचा धोका वाढवतात. कारण या पेयांमध्ये जास्त प्रमाणात शुगर असते, जी शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढवते. ज्यामुळे स्टोन तयार होतात.
लाल मांस
कोणत्याही प्रकारच्या लाल मांसाचं नियमितपणे अधिक प्रमाणात सेवन करत असाल तर याने पित्ताशयात स्टोन होण्याचा धोका वाढतो. कारण यात जास्त फॅट असतं, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं.
जास्त फॅट असलेले डेअरी प्रोडक्ट
दूध, पनीर आणि इतरही डेअरी उप्तादनांमध्ये जास्त फॅट असतं. जे पित्ताशयात स्टोनचा धोका वाढण्याचं कारण ठरतं. या पदार्थांनी कोलेस्ट्रॉलचं प्रमाणंही वाढतं.