Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. पण सगळ्यांनाच या उपायांचा फायदा मिळतो असं नाही. एक्सपर्ट नेहमीच वजन कमी करण्यासाठी पायी चालणे, धावणे किंवा पायऱ्या चढण्याचा सल्ला देतात. मात्र, अनेकजण यात कन्फ्यूज होतात की, धावणे किंवा पायऱ्या चढणे यापैकी जास्त फायदेशीर काय असतं? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
धावल्याने मसल्स होतात मजबूत
धावणं हा एक परिपूर्ण व्यायाम मानला जातो. शरीरातील वेगवेगळे अवयव मजबूत होण्यास धावल्याने मदत मिळते. तर पायऱ्या चढल्याने पाय, कंबर म्हणजे लोअर बॉडीची स्ट्रेंथ वाढते.
जॉईंट्सवर प्रभाव
धावणं ही एक हाय इम्पॅक्ट एक्सरसाईज आहे. धावल्याने जॉईंट्सच्या समस्या किंवा इजा होण्याचा धोका असतो. धावल्याने कंबरदुखी, गुडघेदुखी, तळपायांमध्ये वेदना अशा समस्या होऊ शकतात. तसेच पायऱ्या चढणे हा एक लो इम्पॅक्ट वर्कआऊट असतो. याने गुडघे आणि जॉईंट्सवर कमी स्ट्रेस पडतो. त्याशिवाय हा एक चांगला कार्डियोवस्कुलर वर्कआऊट आहे.
दोन्ही करा फॉलो
वजन कमी करण्यासोबतच ओव्हर ऑल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी धावणं आणि पायऱ्या चढणं या दोन्हींचा आपल्या रूटीनमध्ये समावेश करावा. सकाळी तुम्ही रनिंग करू शकता तर ऑफिसमध्ये किंवा घरात जाण्यासाठी इमारतीच्या लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची गरज पडत नाही. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी या दोन्ही एक्सरसाईज फॉलो करू शकता.