शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

तुम्ही कोणते खाद्यतेल वापरता? तुम्ही वापरत असलेल्या खाद्यतेलाचे फायदे व दुष्परिणाम जाणून घ्याच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 5:52 PM

कोणते तेल आपल्या शरीरासाठी जास्त चांगले असते ? (Which Oil Is More Beneficial For Health) आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नाची उत्तरे देणार आहोत. जाणून घेऊया आपल्या रोजच्या वापरातील कोणते तेल आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते.

भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती वेगतवेगळ्या आहेत. आंबट, गोड, तिखट, चमचमीत अशा वेगवेगळ्या चवींचे पदार्थ खायला सर्वानाच आवडते. त्यातही तळलेले पदार्थ सर्वांच्या विशेष आवडीचे असतात. मग हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या तेलांचादेखील वापर करतो. मात्र सर्वच प्रकारचे तेल आपल्या शरीरासाठी चांगले असतात का ? कोणते तेल आपल्या शरीरासाठी जास्त चांगले असते ? (Which Oil Is More Beneficial For Health) आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नाची उत्तरे देणार आहोत. जाणून घेऊया आपल्या रोजच्या वापरातील कोणते तेल आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते.

ऑलिव्ह ऑईलऑलिव्ह ऑईल (Olive Oil) आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असते. यात ओमेगा-6 आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड (Omega-6 And Omega-3 Fatty Acids) असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. ऑलिव्ह ऑईलमध्ये शरीराला आवश्यक असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असतात. हे तेल खूप पौष्टिक असते. यात काही प्रमाणात व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन-के देखील असते (Olive Oil Is Good For Health). त्यामुळे अनेक जण या तेलाला पसंती देतात. ऑलिव्ह ऑईल शरीरातील जळजळ देखील कमी होते.

शेंगदाणा तेलशेंगदाण्यापासून हे तेल बनवले जाते. घरातील अन्नपदार्थ बनवण्यासाठी अनेक लोक शेंगदाणा तेलाला (Peanut Oil) पसंती देतात. या तेलात आरोग्यदायी घटक असतात. यात अँटी-ऑक्सिडेंट्स असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. तसेच या तेलात फॅटी अॅसिड असते. याशिवाय या तेलात स्टेरिक अॅसिड, पाल्मिक अॅसिड आणि ओलिक अॅसिड देखील आढळते हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. शेंगदणा तेल हृदयासाठी देखील अतिशय उपयुक्त असते. या तेलामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. या तेलात भरपूर प्रमाणात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड (Monounsaturated Fatty Acids) असते. जे शरीरातील चरबी वाढू देत नाही आणि बॅड कोलेस्ट्रॉलला देखील शरीरापासून दूर ठेवण्यास मदत होते.

राईस ब्रान ऑइलराईस ब्रान ऑइल (Rice Bran Oil) हे स्वयंपाकासाठी उपयोगी असलेल्या आरोग्यदायी पर्यायांपैकी एक उत्तम पर्याय आहे. यात ई जीवनसत्त्व आणि ॲंटी-ऑक्सिडेंट चे प्रमाण जास्त असते. तसेच हे तेल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते. राईस ब्रॅन ऑइलमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स (Polyunsaturated Fats) आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे (Monounsaturated Fats) परिपूर्ण संतुलन आढळते. त्यामुळे हे तेल हृदय निरोगी ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. हे तेल त्वचेसाठी देखील उपयुक्त असते. यांतील व्हिटॅमिन-ई मुळे त्वचा मऊ, तजेलदार आणि सुरकुत्यामुक्त होण्यास मदत होते. तसेच व्हिटॅमिन ई रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवते. राईस ब्रॅन ऑइल तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि शरीरातील ऍलर्जी दूर करते.

सूर्यफूल तेलहे तेल सूर्यफुलाच्या बियांपासून (Sunflower Oil) तयार केले जाते. या तेलात भरपूर जीवनसत्व असतात. त्यामुळे हे तेल आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सूर्यफूलाच्या तेलात अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस् मुबलक प्रमाणात आढळतात. यात ओलिक आणि लिनोलिक फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. तसचे यातील फॅटी अॅसिडस् शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते. सूर्यफूल तेल तुम्हाला हृदयविकारापासून वाचवू शकते. याशिवाय सूर्यफूल तेलात व्हिटॅमिन-ई देखील मुबलक प्रमाणात असते. हे तेल शरीरासाठी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. सूर्यफूल तेलामध्ये फायटोस्टेरॉल आणि टेरपेनॉइड्स हे तत्त्व आढळता. यामुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

तेलांचे हे सर्व प्रकार जरी आपल्या शरीरासाठी चांगले असले, तरीदेखील कोणत्याही तेलाचा अतिवापर आपल्यासाठी घातक ठरू शकतो. जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाऊ नये. त्याचप्रमाणे एकाच तेलात वारंवार पदार्थ तळू नये. कारण असे वारंवार गरम झालेले तेल आपल्या शरीरासाठी जास्त हानिकारक असते. आपण कोणत्याही तेलाचा वापर करत असू, तरी त्याचे एक प्रमाण ठरवावे. ब्लडप्रेशर (Blood pressure), डायबिटीज (diabetes) असे काही आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा आणि तेलाचा प्रमाणात वापर करावा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स